महालक्ष्मी विद्यालयाचे स्नेहसम्मेलन उत्साहात
नागपूर, ता. २७पंचशील नगर येथील स्व.हिराबाई गायकवाड शिक्षण संस्था अंतर्गत संचालित महालक्ष्मी उच्च प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेहसम्मेलन मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळी कार्यक्रमाचे पाहुणे स्व.हिराबाई गायकवाड शिक्षण संस्थेचे सचिव सुरेश गायकवाड, अध्यक्षा वेणुताई गायकवाड, प्रभागाचे नगरसेवक जितेंद्र घोडेश्वर, शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानोबा केंद्रे उपस्थित होते.
शाळेच्या सांस्कृतिक रंगारंग कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कला गुणांना व्याव मिळते असे मार्गदर्शन सुरेश गायकवाड यांनी केले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे संचालन आयज झडिये यांनी केले. आभार नंदकिशोर सवालाखे यांनी मानले. शाळेच्या शिक्षकवृंदासह विद्यार्थी उपस्थित होते.
स्व.हिराबाई गायकवाड शिक्षण संस्थेचे सचिव सुरेश
गायकवाड यांच्या सत्कार करतांना मुख्याध्यापक ज्ञानोबा केंद्रे.
No comments