Breaking News

"फुड अँड व्हिजीटेबल प्रोसेसिंग" कार्यशाळा १८ डिसेंबरला


नागूपर, ता. ४ :  इंडो  इस्त्रायल  कृषी  विकास  संस्था  नागपूर आणि  हुंडाई  एक्युपमेंट्स यांच्या संयुक्त विद्यमाने   "फुड  अँड व्हिजीटेबल प्रोसेसिंग"  या विषयावर  एक दिवसीय कार्यशाळा  सी.पी क्लब जवळ  अधिक्षक कृषी  अधिकारी, सिव्हिल लाईन सभागृहात येथे (बुधवारी)  १८  डिसेंबरला  आयोजित  करण्यात आले आहे. 

   फूड प्रोसेसिंगचे छोटे  उद्योग अत्यंत  कमी गुंतवणुकीतून  जास्त नफा देणारे उद्योगाबद्दल मार्गदर्शन  करण्यात येईल.  कार्यक्रम  १८  डिसेंबर (बुधवारी)  सकाळी १० वाजता  पासून संध्याकाळपर्यंत असेल  
  ज्यांना छोटे  उद्योगाव्दारे  आपले  करिअर  करावयाचे आहे असे युवक ,  महिला व बचत  गट व फार्मर प्रोड्युसर कंपनी इ.साठी असून ५०० रुपये  नोंदणी शुल्क आहे.  
        फूड प्रोसेसिंग मध्ये लघु  उद्योग लावून चांगला नफा मिळविण्यासाठी  संधी उपलब्ध झाली आहे. आवश्यकता असल्यास सर्वानी  सदरील  कार्यशाळेचा  फायदा घ्यावा. अशी माहिती  इंडो इस्त्रायल कृषी विकास संस्थेचे सुनील मानकीकर  यांनी दिली.  

3 comments:

  1. Sir mai fruit and vegetable processing ka ek sall ka course hingna ke government iti se kar raha hu thankyou so much sir information share karne ke liye mai definaitly visit karunga thankyou

    ReplyDelete