Breaking News

"समाजाला जागवू या,संविधान रुजवू या"

महामानवाला अभिवादन : अभिवादन  रॅलीतून प्रबोधन          
नागपूर,ता.६ "आपला देश, आपले सरकार संविधानाने दिला 
अधिकार", "भारत माझी माऊली संविधान त्याची सावली"
 "संविधानाचे आश्वासन ,कायद्याचे संरक्षण" "समाजाला जागवू या, संविधान रुजवू या" अशा घोषव्याक्यातून प्रबोधन करीत  शिक्षण संस्थाच्या माध्यमातून काढलेल्या  रॅलीच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. महापरिनिर्वाण दिनानिमित्त  विविध शाळेच्या विद्यार्थांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
 उत्तर नागपुरातील नागसेन विद्यालय, लिटिल स्कॉर्लस पब्लिक स्कुल,  आदर्श कन्या विद्यालय , आदर्श नागसेन प्राथमिक स्कुल यांच्या संयुक्त विद्यमाने रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहा डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण झाले. महापरिनिर्वाण झाले असले तरी त्यांचे विचार पुस्तकात मर्यादित न राहता सर्वत्र पोहोचविण्यासाठी शिक्षण संस्थांमार्फत मागील २० वर्षा पासून बाबासाहेबांचे विचार नवीन पिढीपर्यंत पोहोचविल्या जाते. अशी माहिती नागसेन संस्थेचे सचिव रूपक जांभूळकर यांनी दिली.
चार शाळा मिळून निघालेली हि रॅली  १० नं पूल, आवळे बाबू चौक, लष्करीबाग, कमाल चौक, इंदोरा चौक, इंदोरा बुद्ध विहार , नागसेन शाळेच्या पटांणावर परतली. यावेळी संस्थेचे सहसचिव सांध्य जांभूळकर, उपाध्यक्ष कुमुदिनी खोब्रागडे, 
शाळेचे मुख्यध्यापक सुमेध फुलझले, मुख्यध्यपिका शकुंतला ठाकूर, लीना टेंभेकर, हर्षा पाटील, पर्यवेक्ष अनिल टेभुर्णे, सुनील मुळे, वर्षा रामटेके , शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांसह बारशेवर विद्यार्थिनी रॅलीत सहभागी नोंदविला.

रॅलीत टिपलेले छायाचित्र 






सविस्तर माहितीसाठी दै.सकाळ या संकेतस्थळावर भेट द्या 





No comments