Breaking News

'१३८ वा' जागतिक धम्मध्वज दिन

*"जाहिर आवाहन*

*८ जानेवारी_ दिनविशेष*

*'१३८ वा' जागतिक धम्मध्वज दिन*

*सर्वांना क्रांतिकारी जयभीम.*

*'१३८ वा' जागतिक धम्मध्वज दिनानिमित्ताने प्रथम सर्वांना मंगल कामना.*

 *बौध्द धम्माच्या प्रचार व प्रसारासाठी संपूर्ण जगातील बौध्दांचे एकच प्रतिक असावे, या विचाराने सन १८८० मध्ये श्रीलंकेचे अनागारिक देवमित्र धम्मपाल, महास्थविर भदन्त गुणानंद, भदन्त सुमंगल, बौध्द विव्दान जी. आर. डिसिल्वा इत्यादींनी मिळून* 
*निळा, पिवळा, लाल, पांढरा व केशरी अशा पाच रंगाच्या उभ्या व आडव्या पट्ट्यामध्ये 'जागतिक बौध्द धम्मध्वजा' ची निर्मिती केली आहे.*

*कालांतराने त्याला विश्व मान्यता प्राप्त झाली. याला पाली भाषेत  'षड् रोशनी ध्वज' किंवा 'धम्म ध्वज' असे म्हणतात.*

*हा धम्मध्वज नुसता ध्वज नसून बौध्द धम्माचे नेतृत्व दर्शविणारे बौध्द धम्माचे आचार विचाराचे प्रतिक म्हणून बौध्द धम्माच्या अनुयायांनी सन्मान सदोदीत राखावे.*

 *_धम्मध्वज मधील पाच रंग आणि रंगाचे महत्व_*

*१) _निळा_ :--- शांती व प्रेमाचे प्रतिक.*

*२) _पिवळा_ :--- तेज व उत्साहाचे प्रतिक.*

*३) _लाल_ :--- शौर्य व धैर्याचे प्रतिक.*

*४) _पांढरा_ :--- शुध्दता व निर्मळतेचे प्रतिक.*

*५) _केशरी_ :--- त्याग, दया व करुणेचे प्रतिक.*

*👉🏻 याचे प्रमाण उभे ५० सें. मी. व आडवे ७० सें. मी. आहे.*

*👉🏻 हा 'धम्मध्वज'*
*८ जानेवारी रोजी*
*"जागतिक धम्मध्वज दिन"* *म्हणून बौध्द जनांनी*
*आपले घर, विहार, स्मारक, भवन, धम्म परिषद, धम्म सभेचा मंच, धम्म उत्साहाचे स्थळ इत्यादी ठिकाणी सर्वांत उंच असेल, असा फडकवावा.*

*👉🏻'धम्म ध्वज' - बुध्द पोर्णिमा, धम्मचक्र प्रवर्तन दिन, धम्मक्रांती दिन व धम्म परिषदांचे वेळी ध्वजस्तंभावर फडकवून वंदना करावी, असे जागतिक ठराव घेण्यात आला.*

*👉🏻म्हणूनच ८ जानेवारी _"जागतिक धम्मध्वज दिन"*
*म्हणून जिथे जिथे बौध्द धम्माची वसाहत आहेत,*
*जिथे जिथे बुध्द विहार आहेत;*
*तेथील ध्वजस्तंभावरील  बौध्द धम्माचे प्रतिक असणारा (पंचरंगी ध्वज) जुना धम्मध्वज बदलून नविन धम्मध्वजाचे "धम्मध्वजारोहण" करून*
*प्रत्येक बौध्द व्यक्तिने धम्म ध्वजाचा सन्मान व अभिमान बाळगावा.*

*बुद्धं नमामी 🙏*
*धम्मं नमामी 🙏*
*संघं नमामी 🙏🏼*
संकलन :- निलेश राऊत

No comments