Breaking News

आमदारांनी केला जेष्ठ नागरिकांचा सत्कार

पंडित दिनदयाल उपाध्याय जयंतीनिमित्त उपक्रम


नागपूर, ता. २७ : प्रभाग क्र १ भीम चौक येथील आहुजा नगरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्तर नागपूर क्रीडा संकुल सभागृहात पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी तर्फे जेष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला.
अंत्योदय अंतर्गत भारतातील एकही व्यक्ती गरीब नसावे असे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे स्वप्न होते. आ.मिलिंद माने यांनी जेष्ठ नागरिकांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी शिक्षण क्षेत्रात पुरस्कार प्राप्त जेष्ठ नागरिक भास्कर उके यांचे शॉल व माजी प्रधानमंत्री स्व.अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर प्रकाशित पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. 
यावेळी म.न.पा स्थायी समितीचे अध्यक्ष विरेंद्र कुकरेजा, नगरसेवक महेंद्र धनविजय, दिलीप गौर, महामंत्री विजय तांबे, राजू ढोलवानी, सुनीता महाले,भाजप कायकर्ते व जेष्ठ नागरिक  उपस्थित होते.


३० सप्टेंबर २०१८  दैनिक देशोन्नती वृत्तपत्रात बातमी 


-------------------------------------------------------------------

काचऱ्याच्या दुर्गंधीने  नागरिक त्रस्त ..सविस्तर माहितीसाठी खालील दिलेल्या लिंक बघा👇👇👇
https://m.maharashtratimes.com/citizen-reporter/nagpur-local-news/garbage-was-spoiled-by-civilians/articleshow/65972960.cms

No comments