Breaking News

"शोले हशीके" ऑन लाईन लघु चित्रपट लवकरच




"शोले हशीके" ऑन लाईन लघु चित्रपट लवकरच

नागपूर,ता.२१ प्रियंकाज पेटलहार्ट फाऊंडेशन आणि प्रियंका टिप्स अँण्ड अकॅडमी तर्फे तयार करण्यात आलेल्या लघु चित्रपटाच्या कॉपीचे प्रकाशन नुकतेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मोहब्बत सिंह तुली, डॉ. प्रियंका सिंह उपस्थित होते. 
       या चित्रपटामध्ये देशाच्या विकासाचे तेरा मुद्दे दाखविण्यात आले आहे. हा चित्रपट लवकरच ऑनलाइन प्रसारित करण्यात येणार असल्याची माहिती चित्रपटाचे निर्माते डॉ. प्रियंका सिंह यांनी पत्रपरिषदेत दिली. या लघु चित्रपटा नागपूर, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, झारखंड व कलकत्ता येथील १८० कलाकारानी भाग घेतला असून यात लहान मुलां पासून तर वृध्दापंर्यत मंच उपलब्ध करून देण्यात आलां आहे. 
        या चित्रपटाला माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम, प्रणव मुखर्जी, व दलाई लामा यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आला आहे.


No comments