Breaking News

वृत्तपत्र विक्रेत्यांवर चाकूने हल्ला



✍..निलेश राऊत
नागपूर,ता.११ उत्तर  नागपरातील पाचपावली पोलीस स्टेशन अंतर्गत शुक्रवारी  पहाटे ४.३० वाजता  वृत्तपत्र विक्रेत्याला गुंड लोकांनी चाकूने हल्ला करून जखमी केले.
          प्रेमदास देवाजी सहारे वय ५२ वर्ष राहणार नालंदा, नारी येथील रहिवासी असून  माऊंट रोड वृत्तपत्र  सेंटर  वर सायकलने नेहमी प्रमाणे वृत्तपत्र आण्यासाठी कामठी रोड मार्गाने जात असतांना तीन चोरटे चाकू घेऊन आडवे झाले."तेरे जेब में कितने पैसे है निकाल"  असे बोलू लागले प्रेमदास यांनी नकार देताच एका ने पाठीवर चाकूने हल्ला करून जखमी केले. प्रेमदास यांनी आपली सायकल तिघांवर फेकून दिली आणि   स्वतःचा जीव वाचवत आरडाओरडा करत पुढे पळाले..लोक मदतीला येताच बघून चोरट्यानी पळ काढला. जखमीला पाचपावली पोलिसांच्या मदतीने इंदिरा गांधी रुग्णयालत दाखल करण्यात आला असून उपचार सुरु आहे ..

No comments