जागो (वाहन घेतलेले) ग्राहक जागो
नागपूर, ता: ५ नवीन गाडी घेत असताना कोणत्याही ग्राहकाला खूप सवलती व आमिषे दाखविली जातात, आपण यातील किती बाबी पूर्ण झाल्या किंवा नाही या पाहतो का? उत्तर-एकही बाब आपण पाहत नाही, परिणामी आपल्याला मान्य केलेल्या सर्व गोष्टी या कंपनी कडून डीलर कडे येतातही आणि कागदोपत्री सर्व ग्राहकाला दिले घेतले जातेही, पण ग्राहकाला मात्र त्या गोष्टी मिळत नाहीत.
सर्व कंपनी फ्री सर्व्हिसिंग देतात, आपण गाडी घेतल्यानंतर काही दिवसांनी फ्री सर्व्हिसिंग ला गाडी नेतो, डीलर आपली गाडी ठेवून, घेतो 2 दिवस ठेवतो, आणि आपण मागे लागल्यावर आपल्यावर उपकार केल्यासारखे गाडी सर्व्हिसिंग(?)करून देतो. गाडी त्यांना देताना आपल्या गाडीचा काय काय प्रॉब्लेम आहे ते स्पष्ट सांगा, गाडी परत माघारी घेताना आपण गाडी चे नेमकं काय काय केलं हे नक्की विचारा, आपल्याला एक बिल दिल जाईल ते ज्या बाबीच आहे त्या बाबी आपल्या गाडीत झाल्यात का? पहा आणि विचारा? त्या बिलातील कोणत्या गोष्टी फ्री मध्ये असूनही आपल्याला बिलात त्याचे पैसे लावले आहेत त्या पहा व विचारा, हा आपला हक्क आहे.
काही दिवसांपूर्वी माझ्या एका मित्राने एका कंपनीची टू व्हीलर गाडी खरेदी केली, त्यांनी गाडी फ्री सर्व्हिसिंग ला दिली, ऑइल लिकेज इ. प्रॉब्लेम सांगितले, उद्या या आज होणार नाही असे सांगून लगेच हाकलून लावण्याचे काम डीलर च्या लोकांनी केले, त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता गाडी दिली असता, 4 तासांनी तय्यार होईल असे सांगितले, संध्याकाळी 6 ला जाऊनही गाडी तय्यार झाली नाही, नाविलाजाने दुसऱ्या दिवशी दुपारपासून मागे लागून त्यांनी काम करून घेतले, त्यानंतर गाडी धुवून ओके करून देतो 1 तासात या म्हणून सांगितले, त्यानंतर गाडी घेण्यास गेल्यावर मस्त पैकी एक बिल त्यांच्या हातात दिले, त्यात काय काय व कशाचे बिल विचारल्यावर त्यांनी 4 ते 5 बाबी सांगितल्या , आपल्याला काहिही कळत नसत - त्याचा फायदा हे घेतात, त्यानंतर नायट्रोजन चे 25 रु लावलेले दिसले , नायट्रोजन कुठे भरला, विचारल्यावर त्यांनी आता भरून देतो असे बोलले, गाडी वॉश केली का विचारल्यावर त्यांच्याकडून चावी घेऊन त्यांनी गाडी वॉश ला नेली. वॉश करून आणल्यावर त्यांनी नायट्रोजन न भरताचं गाडी घेऊन जायला सांगितले, परंतु नायट्रोजन भरला का विचारल्यावर रागातच गाडी पुढे घ्या करत गाडीत नायट्रोजन भरला.
मित्रानो, लक्षात घ्या, 25 रु एक गाडी नायट्रोजन साठी , हा नायट्रोजन भरताना त्यांनी आपल्याला विचारलं नाही, ते विचारणं अत्यंत गरजेच होत, आपण 25 रु जाऊ द्या म्हणून सोडून देतो, परंतु दररोज सुमारे 200 गाड्या 25 रु असे महिन्याचे सुमारे 1,50,000 रु(दीड लाख रुपये) रुपये काहीही न करता महिन्याला डीलर कमवतात, मित्रानो एका ऍटम (जो ग्राहकाला दिलाही जात नाही) मध्ये इतके पैसे, विचार करा
आपण गाडी घेतानाच काय काय फ्री आहे ते लिहून घ्या, एका कंपनीच्या डीलर ने केलेला प्रताप लक्षात घ्या, लुटारू डीलर विरुद्ध त्यांनी तक्रार दिली तर आहेच पण ग्राहकांनीही सावध राहावं हीच नम्र विनंती.
कंपन्या ब्रँड साठी चांगल्यात चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करतात परंतु हे शोरूमवाले मात्र घोळ घालतात
हिरो- 18002660018
होंडा- 18001033434
टीव्हीएस- 18004252077
बजाज- 18002332453
महिंद्रा- 18004251624
टाटा- 18002097979
मारुती सुझुकी- 18001800180
सुझुकी- 18001021800
कुबोटा- 18002123738
सर्व कंपनीचे टोल फ्री नंबर गुगल वर सर्च केल्यावर मिळतात किंवा शोरूम मध्ये विचारून घ्यावेत, तक्रार बुक मागून त्यात तक्रार लिहा
No comments