Breaking News

बाबा ताजुद्दीन अमृत महोत्सव ३ मार्च

बाबा ताजुद्दीन  अमृत महोत्सव ३ मार्च


✍...निलेश राऊत
नागपूर,ता. १ हजरत बाबा ताजुद्दीन दर्गा वाकी येथे अमृत महोत्सवा निमित्ताने ३ ते ९ मार्च पंर्यत विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती  बाबा ताजुद्दीन दर्गा वाकी ट्रस्टचे अध्यक्ष प्रभाकरराव डाहाके पाटील यांनी पत्रपरिषदेत दिली. सहा दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमामध्ये ३ मार्च रोजी वाकी येथील काशीनाथ डहाके पाटील बाबा यांच्या वाडयातून व नागपूर येथील ताजबाग येथून निघणारे दोन्ही  संदल  वाकी दर्गा येथे पोहचल्यावर सांयकाळी  झेंड़ा वंदन करण्यात येेईल. बाबा ताजुद्दीन यांच्या मजारवर फुलांची चांदर, मेवा मिठाई चढ़वून मंगल आरती करून ऊर्सला प्रांरभ होईल. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर जिल्हयाचे पालकमंत्री चंन्द्रशेखर बावनकुळे, आमदार सुनिल केदार उपस्थित राहतील. उपस्थित पाहुण्याच्या हस्ते " श्री ताज अमृत संदेश ग्रंथ" व " अमृत महोत्सव विशेषकांचा"  विमोचन करण्यात येईल. वाकी संस्थे तर्फे प्रकाशित श्री चा पवित्र ग्रंथ ताजलीलामृतचे  तेलंगु भाषेतील अनुवादीत ग्रंथाचे प्रकाशन करण्यात येईल. त्यानंतर कव्वालीचा कार्यक्रम होईल. रविवार ४ रोजी सांयकाळी ६ वाजता व मनोरंजन मुशायरे व हिंदी कवी संम्मेलन होईल. समाजसेवक डॉं. ओमप्रकाश मिश्रा व प्रा. सत्येन भूषण यांच्या प्रमुख उपस्थितीत  बाबा ताजु६ीन औलिया यांच्या सुफीदर्शनाची प्रासंगिकता " वौचारीक गोष्टी" चे आयोजन करण्यात येईल. सोमवार ५ रोजी सुमधुर
 संगित व कव्यालीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ६ ते ९ मार्च पंर्यत रोज सकाळी १० वाजे पासून ह. भ. प. श्रीरामपंत जोशी महाराज ( नागपूर ) , जगन्नाथ पाटील महाराज ( मुंबई ), चंद्रकांत वांजळे महाराज ( पूणे ) यांचे किर्तन होईल. या ऊर्स दरम्यान भाविकांची गैरसोय होवू नये म्हणून विशेष काळजी घेण्यात येईल असेही त्यांनीं यावेळी सांगितले.
ताजरत्न पुरस्कार वितरण
ताज अमृत महोत्सव वाकी ऊर्स निमित्ताने ताज सेवेत समर्पित विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तिचा संस्थेच्चा वंतीने ३ मार्च रोजी सांयकाळी प्रमुख पाहुण्याच्या हस्ते " श्री ताजरत्न पुरस्कार" ने सन्मानित करण्यात येईल. यात कला क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणारे गोपाल मार्कड़े ( पेन्टर ) नागपूर, साहित्य क्षेत्रातील स्व. कांत देसाई नागपूर, वास्तू विशारद किशोर चिद्दलवार, स्ट्रक्चरल डिझायनर पी. टी मसे, ३६५ दिवस बाबाची लंगर सेवा चालविणारे राजु गुप्ता यांचा समावेश राहणार असल्याचेहि त्यांनी यावेळी सांगितले.
पत्रपरिषदेला ज्ञानेश्वर डहाके पाटील, गजानन निखाडे सत्येन भूषण, नारायण गिरी, मिलींद केदार, दत्तु जगताप, सुधाकर वाघुलकर आदी उपस्थित होते.

No comments