संविधानाचा खरा सन्मान कृतीतूनच : अभिजीत दीपके : N7 News Voice
संविधानाचा खरा सन्मान कृतीतूनच : अभिजीत दीपके
![]() |
नागपूर : भारतीय संविधानाने दिलेली समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय ही मूल्ये केवळ भाषणातून किंवा औपचारिक कार्यक्रमांतून नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीतून जपली पाहिजेत. रक्ताला जात, धर्म किंवा कोणताही भेदभाव नसतो. त्यामुळे रक्तदान हा सामाजिक एकता आणि मानवतेचा प्रभावी संदेश देणारा उपक्रम आहे. रक्तदानासारख्या सामाजिक कार्यातून संविधानातील मानवतावादी विचारांचा खरा सन्मान होतो, असे प्रतिपादन कॉकरोच जनता पार्टीचे (सीजेपी) संस्थापक अभिजीत दीपके यांनी केले.
भारतीय संविधान दिनानिमित्त गुरुवारी (२६ नोव्हेंबर) संविधान चौक येथे आयोजित रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. समता सैनिक दल, प्रेरणादीप बहुउद्देशीय संस्था आणि टीम धम्मा फेस्टिव्हल यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. या शिबिरात ५० रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रक्तदान केले.
यावेळी कॉकरोच जनता पार्टीचे सह-संयोजक आशुतोष रांका प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच समता सैनिक दलाचे निलेश बागडे, रमेश नागदवणे, सौरभ मेश्राम, सिद्धार्थ नंदेश्वर, विद्यानंद रंगारी, क्षितिज रामटेके, प्रदीप गणवीर, धम्मरक्षित वाघदे, राजेश धमगाये, संजय मेश्राम, राजकुमार मेश्राम, रोहन वासनिक, निखिल ताकसांडे आणि योगेश सुखदेवे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाला समानतेचा अधिकार आणि सन्मानाने जगण्याचा मार्ग दिला. संविधानातील मूल्ये प्रत्यक्ष जीवनात आचरणात आणणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. गरजू व्यक्तीला मदत करणे, संकटात असलेल्या रुग्णाला रक्त उपलब्ध करून देणे आणि सामाजिक जबाबदारी स्वीकारणे, हीच संविधानाच्या विचारांची खरी अंमलबजावणी आहे. तरुणांनी अशा सामाजिक उपक्रमांमध्ये पुढाकार घ्यावा, असे आवाहनही अभिजीत दीपके यांनी केले. शिबिराच्या यशस्वितेसाठी समता सैनिक दल, प्रेरणादीप बहुउद्देशीय संस्था आणि टीम धम्मा फेस्टिव्हलच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
![]() |
| True Respect for the Constitution Through Action: Abhijit Dipke |
50 Donors Participate Enthusiastically in Blood Donation Camp at Samvidhan Chowk
Nagpur: The values enshrined in the Indian Constitution—equality, liberty, fraternity, and justice—must be upheld not merely through speeches or formal events, but through concrete action. Blood knows no caste, religion, or any other form of discrimination; therefore, blood donation serves as a powerful message of social unity and humanity. Engaging in social endeavors like blood donation is a true tribute to the humanitarian ideals embedded in the Constitution, stated Abhijit Dipke, founder of the 'Cockroach Janata Party' (CJP). He was speaking at the inauguration of a blood donation camp held at Samvidhan Chowk on Thursday (November 26) to mark Indian Constitution Day. The camp was organized jointly by Samata Sainik Dal, Preranadeep Bahuddeshiya Sanstha, and Team Dhamma Festival. At the beginning of the event, dignitaries paid tribute to Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar by garlanding his portrait. Fifty donors participated enthusiastically, contributing their blood. Ashutosh Ranka, co-convener of the Cockroach Janata Party, was present as the chief guest.



No comments