डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सॉफ्टपॉइंट इन्स्टिट्यूटमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन | N7 News Voice
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सॉफ्टपॉइंट इन्स्टिट्यूटमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन
![]() |
| विजेत्या विद्यार्थ्यांचा सत्कार करताना मान्यवर |
नागपूर : तथागत चौक येथील सॉफ्टपॉइंट इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाला सॉफ्टपॉइंट इन्स्टिट्यूटचे संचालक राहुल वासनिक, मिशन महा एमपीएस कोचिंगचे संचालक सचिन पाटील, चंकी आणि डॉली फास्ट फूड सेंटरचे संचालक संदीप खोबरागडे उपस्थित होते.
याप्रसंगी संदीप खोबरागडे प्रामुख्याने उपस्थित होते. "एक प्राध्यापक असूनही आपल्या आवडीला व्यावसायिक रूप कसे द्यावे," यावर त्यांनी प्रकाश टाकला. शैक्षणिक क्षेत्राबाहेरही वेगळी वाट कशी चोखाळता येते, याचे त्यांनी उत्तम उदाहरण विद्यार्थ्यांसमोर मांडले. सचिन पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर कोणतेही कठीण ध्येय गाठणे शक्य आहे. राहुल वासनिक यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात 'सिम्बॉल ऑफ नॉलेज' डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे महत्त्व विशद केले. गेल्या १० वर्षांपासून सातत्याने ज्ञानाच्या देवाणघेवाणीचे हे कार्य ते अविरतपणे करत असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे संचालन हिमांशी नंदेश्वर हिने केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सेजल ढोके, संध्या नागदेवे, निधी टेंभुरणे, मयांक गायकवाड, कमलेश कोटवार, मनोज साने आणि सर्व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

No comments