२,३०० मैलांची वारी आणि एका मुक्या जीवाची 'निष्ठा'; भिक्खूंसोबत चालणाऱ्या 'अलोका'ची जगभर चर्चा!
२,३०० मैलांची वारी आणि एका मुक्या जीवाची 'निष्ठा'; भिक्खूंसोबत चालणाऱ्या 'अलोका'ची जगभर चर्चा!
आजच्या धावपळीच्या, स्वार्थाने भरलेल्या युगात माणूस माणसापासून दूर जात असताना, एका मुक्या प्राण्याने संपूर्ण जगाला ‘माणुसकी’, ‘निष्ठा’ आणि ‘निस्वार्थ प्रेम’ यांचा खरा अर्थ शिकवला आहे. अमेरिकेत सुरू असलेल्या ‘वॉक फॉर पीस’ (शांततेसाठी पदयात्रा) या मोहिमेचा हा अनपेक्षित नायक आहे — ‘अलोका’, एक साधा, पण असामान्य कुत्रा.
नॅचेझ, मिसिसिपी | N7 News Voice
जखमी अवस्थेतून 'शांतीदूत' बनण्यापर्यंतचा प्रवास
अलोकाची गोष्ट एखाद्या चित्रपटाला शोभेल अशीच आहे. एका बौद्ध भिक्षूंना हा कुत्रा अत्यंत जखमी आणि मरणासन्न अवस्थेत रस्त्यावर सापडला होता. त्यांनी केवळ त्याला उपचार देऊन वाचवले नाही, तर त्याला 'अलोका' (म्हणजेच प्रकाश) असे नाव देऊन आपल्या कुटुंबाचा भाग बनवले. आज तोच अलोका आपल्या पाठीराख्या भिक्षूंसोबत अमेरिकेच्या रस्त्यांवर शांततेचा संदेश पसरवत आहे.
पाय सोलापुरे झाले, पण जिद्द कायम!
टेक्सासच्या रखरखीत उन्हातून सुरू झालेली ही पदयात्रा आता मिसिसिपी राज्यात पोहोचली आहे. ४१ दिवसांचा खडतर प्रवास, अंगाची लाहीलाही करणारे ऊन आणि हजारो मैलांचे अंतर... पण अलोकाचा उत्साह यत्किंचितही कमी झालेला नाही. भिक्खू टायखिओ टू न्हान यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारा अलोका जेव्हा मिसिसिपी नदीचा ऐतिहासिक पूल पार करत होता, तेव्हा पाहणाऱ्यांचे डोळे विस्फारले.
"आम्ही शांततेसाठी चालतोय, पण अलोका स्वतःच एक शांततेचे प्रतीक बनला आहे. तो बोलत नाही, पण त्याची उपस्थिती आम्हाला आणि जगाला प्रेमाची भाषा शिकवते," असे या पदयात्रेतील आयोजक भावूक होऊन सांगतात.
का ठरतोय अलोका मानवासाठी आरसा?
निस्वार्थ प्रेम: अलोकाकडे पाहिल्यावर जाणवते की, सुख सोयी-सुविधांमध्ये नसून सोबतीत असते.
धैर्य: २,३०० मैलांचे ध्येय गाठण्यासाठी लागणारे मानसिक बळ एका प्राण्याकडून शिकण्यासारखे आहे.
न बोलता संवाद: तो हॉलिवूडच्या रस्त्यांवर असो किंवा न्यूयॉर्कच्या गर्दीत, अलोकाची शांतता ही हिंसेने भरलेल्या जगाला दिलेली चपराक आहे.
अमेरिकेनेही झुकवले डोके
हार्वर्ड आणि स्टॅनफोर्ड सारख्या मोठ्या विद्यापीठांपासून ते संयुक्त राष्ट्रांपर्यंत (UN) अलोकाच्या नावाची चर्चा आहे. अमेरिकन नागरिकांसाठी हे दृश्य थक्क करणारे आहे— एक भिक्खू आणि त्यांचा कुत्रा तासनतास ध्यानाला बसतात, तेव्हा निसर्ग आणि प्राणी यांच्यातील अद्वैत जगासमोर येते.
नॅचेझ शहरात जेव्हा या गटाचे स्वागत झाले, तेव्हा लोकांनी केवळ भिक्खूंचेच नाही तर अलोकाचेही पाय शिवले. ही पदयात्रा केवळ वॉशिंग्टन डी.सी. पर्यंतचा प्रवास नाही, तर ती माणसाच्या अंतर्मनापर्यंत पोहोचलेली एक साद आहे. अलोकाने सिद्ध केले आहे की, जर एखाद्यावर मनापासून प्रेम केले, तर तो जीव लावायला मागे-पुढे पाहत नाही.
-------------------------
A 2,300-Mile Journey of Loyalty:
‘Aloka’, the Silent Hero Walking with Monks, Inspires the World
Natchez, Mississippi | N7 News Voice
From a Wounded Stray to a Messenger of Peace
Aloka’s journey is nothing short of cinematic. Severely injured and on the brink of death, he was found abandoned on the roadside by a group of Buddhist monks. They did not just save his life with medical care; they embraced him as family and named him “Aloka,” meaning “Light.” Today, that same light walks alongside the monks on America’s highways, spreading a powerful message of peace—without uttering a single word.
41 Days, Scorching Heat, Unbreakable Spirit
“We are walking for peace, but Aloka himself has become a symbol of peace.He doesn’t speak, yet his presence teaches the language of love to the world,”said one of the organizers, visibly moved.
Why Aloka Has Become a Mirror for Humanity
Selfless Love: Aloka shows that happiness lies not in comfort, but in companionship.
Courage: His mental strength to complete a 2,300-mile journey is a lesson for humankind.
Silent Communication: Whether on Hollywood streets or in New York’s crowds, Aloka’s calm silence is a powerful response to a world filled with violence.
America Bows in Respect
When the peace march reached Natchez, residents not only bowed before the monks—but also washed Aloka’s paws, a gesture of deep respect and gratitude.
More Than a March
Aloka has proven one simple truth:

No comments