Breaking News

राज एज्युकेशन सोसायटीचा ‘अर्जनम’ क्रीडा महोत्सव जल्लोषात संपन्न!

N7 न्यूज व्हॉइस  : विशेष बातमी

राज एज्युकेशन सोसायटीचा ‘अर्जनम’ क्रीडा महोत्सव जल्लोषात संपन्न!

 विद्यार्थ्यांच्या क्रीडा आणि सांस्कृतिक  महोत्सवात उपस्थित मान्यवर .


नागपूर: विद्यार्थ्यांच्या सुप्त क्रीडा गुणांना आणि सांस्कृतिक प्रतिभेला हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने, राज एज्युकेशन सोसायटी अंतर्गत संचालित सेंट एम.बी. कॉन्व्हेंट अँड ज्युनिअर कॉलेज, ब्लू स्टार कॉन्व्हेंट (पाचपावली) आणि सेंट एम.बी. हायस्कूल अँड किंडर गार्डन या तिन्ही शाखांचा भव्य वार्षिक क्रीडा महोत्सव ‘अर्जनम’ नुकताच पार पडला. आनंदनगर येथील एन.आय.टी. क्रीडा मैदानावर आयोजित या महोत्सवात विद्यार्थ्यांचा उत्साह आणि पालकांचा जल्लोष ओसंडून वाहत होता.

मान्यवरांची उपस्थिती आणि प्रेरणादायी मार्गदर्शन

या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे श्री. रमेश हरडे (विस्तार शिक्षण अधिकारी, जि.प. नागपूर) यांच्या हस्ते रिबीन कापून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर श्री. श्यामसुंदर धोपटे (माजी प्राचार्य, चंद्रपूर), श्रीमती मृणालिनी धोपटे (सदस्य, ज्युवेनाईल जस्टीस बोर्ड), राज एज्युकेशन सोसायटीचे संचालक डॉ. धनराज भुते, एम बी कॉन्व्हेच्या मुख्याध्यपिका  डॉ. अनिता भुते, ब्लु स्टार कॉन्व्हेंटच्या  मुख्याधापिका  स्नेहल धोपटे-भुते, प्राचार्या, विशाखा महाविद्यालयाच्या माला गोडघाटेवंदना समरीत (माजी प्राचार्या, निकुंज विद्यालय) आणि राजेश समरीत (माजी चीफ एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, NIT) यांचा प्रामुख्याने समावेश होता तसेच  लीना चापले (माजी प्राचार्या, पंचशील विद्यालय),  रमेश कुऱ्हाडकर (प्राचार्य, सेंट एम बी कॉन्व्हेंट) शिवानी चेतन वर्मा (मुख्याध्यापिका, सेंट एम बी पब्लिक स्कूल, खसाळा) व इतर मान्यवरांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले यांसह शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. पाहुण्यांनी विद्यार्थ्यांच्या मार्चपास्टचे निरीक्षण करून त्यांना सलामी दिली.

क्रीडा ज्योत आणि शपथ

संस्थेतील आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय खेळाडू शुभी वर्मा, निधी धमगाये, शिवांश कोठांगळे, अनंत खोब्रागडे आणि तनिषा सिपाही यांच्या हस्ते क्रीडा मशाल प्रज्वलित करण्यात आली. क्रीडा प्रमुख मास्टर अनन्या मेश्राम यांनी सर्व खेळाडूंना क्रीडा शपथ दिली. श्री. रमेश हरडे यांनी आपल्या भाषणात "खेळामुळे संघभावना आणि नैतिक मूल्ये जपली जातात," असे प्रतिपादन केले.

सांस्कृतिक आणि शारीरिक कसरतींचे सादरीकरण

उद्घाटन सोहळा अधिक रंजक बनवण्यासाठी विद्यार्थ्यांनी विविध प्रात्यक्षिके सादर केली. यात प्रामुख्याने:

  • लेझीम आणि स्वागत नृत्य

  • अफ्रो झुंबा आणि क्लॅपिंग योगा

  • वूमन एम्पॉवरमेंट थीम डान्स

  • छत्रपती संभाजी महाराज डंबल ड्रिल

  • कराटे, योगा, आणि रिबन ड्रिल

या मनमोहक सादरीकरणाने उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.

तीन दिवसीय स्पर्धांचा निकाल

दिनांक २२, २३ व २४ डिसेंबर रोजी सलग तीन दिवस या स्पर्धा चालल्या. यात १०० मीटर धावणे, हर्डल रेस, स्लो सायकलिंग, लेमन-स्पून आणि बुद्धीबळासारख्या खेळांचा समावेश होता. विजेत्या खेळाडूंना डॉ. अनिता भुते यांच्या हस्ते सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदके देऊन गौरविण्यात आले.

नियोजन आणि आभार

कार्यक्रमाचे सुस्पष्ट सूत्रसंचालन कु. रोमा नंदेश्वर, भाग्यश्री गौर, मोनाली बनसोड आणि वर्षा लोखंडे यांनी केले. क्रीडा शिक्षक श्री. रवी सोनटक्के आणि श्री. मनीष देवघडे यांनी मार्चपास्टचे शिस्तबद्ध नियोजन केले. श्रीमती शैनीला अंजुम यांनी आभार मानले, तर श्रीमती रीना वरघट यांच्या 'वंदे मातरम्' गायनाने सोहळ्याची सांगता झाली.

राज एज्युकेशन सोसायटीचा हा 'अर्जनम' सोहळा केवळ स्पर्धा न ठरता विद्यार्थ्यांसाठी एक सकारात्मक ऊर्जा देणारा अविस्मरणीय अनुभव ठरला, अशी भावना पालकांनी व्यक्त केली.

------------------

N7 News Voice: Special Report

Grand Celebration of Raj Education Society’s Annual Sports Festival ‘Arjanam’!

A spectacular display of sportsmanship and cultural talent by students in the presence of distinguished guests.

Nagpur: To provide a grand platform for the inherent sporting talents and cultural creativity of students, the annual sports festival ‘Arjanam’ was successfully organized by Raj Education Society. The event featured the combined participation of St. M.B. Convent & Junior College, Blue Star Convent (Pachpaoli), and St. M.B. High School & Kinder Garden. Held at the NIT Sports Ground in Anand Nagar, the festival was marked by immense enthusiasm from students and cheers from parents.

Presence of Dignitaries and Inspiring Guidance

The sports festival was inaugurated by the Chief Guest, Mr. Ramesh Harde (Extension Education Officer, Z.P. Nagpur). The event was graced by several prominent personalities, including:

  • Mr. Shyamsundar Dhopte (Former Principal, Chandrapur)

  • Mrs. Mrunalini Dhopte (Member, Juvenile Justice Board)

  • Dr. Dhanraj Bhute (Director, Raj Education Society)

  • Dr. Anita Bhute (Principal, St. M.B. High School)

  • Mrs. Snehal Dhopte-Bhute (Principal, Blue Star Convent)

  • Mrs. Mala Godghate (Principal, Vishakha College)

  • Mrs. Vandana Samrit (Former Principal, Nikunj Vidyalaya)

  • Mr. Rajesh Samrit (Former Chief Executive Engineer, NIT)

  • Mrs. Leena Chaple (Former Principal, Panchsheel Vidyalaya)

  • Mr. Ramesh Kurhadkar (Principal, St. M.B. Convent)

  • Mrs. Shivani Chetan Verma (Principal, St. M.B. Public School, Khasala)

The guests reviewed the disciplined march past and received the salute from the students.

Sports Torch and Oath Ceremony

The formal proceedings began with the lighting of the sports torch by international and national level student-athletes: Shubhi Verma, Nidhi Dhamgaye, Shivansh Kothangle, Anant Khobragade, and Tanisha Sipahi. Sports Captain Ananya Meshram administered the sports oath to all participants. Chief Guest Mr. Ramesh Harde emphasized that "Sports help in developing team spirit, cooperation, and ethical values."

Cultural and Physical Demonstrations

To make the opening ceremony more engaging, students from Nursery to Class 10 presented captivating performances, including:

  • Lezim and Welcome Dance

  • Afro Zumba and Clapping Yoga

  • Women Empowerment Theme Dance

  • Chhatrapati Sambhaji Maharaj Dumbbell Drill

  • Karate, Yoga, and Ribbon Drill

Results of the Three-Day Event

The competitions were held over three days from December 22nd to 24th. Students competed in various events such as the 100m sprint, hurdle race, slow cycling, lemon-spoon race, and chess. Winners were honored with Gold, Silver, and Bronze medals by Dr. Anita Bhute.

Management and Vote of Thanks

The program was efficiently anchored by Ms. Roma Nandeshwar, Ms. Bhagyashree Gaur, Ms. Monali Bansod, and Ms. Varsha Lokhande. Sports teachers Mr. Ravi Sontakke and Mr. Manish Devghade managed the march past and band. The vote of thanks was proposed by Mrs. Shanila Anjum, and the ceremony concluded with a soulful rendition of 'Vande Mataram' by music teacher Mrs. Reena Varghat.

The 'Arjanam' festival proved to be more than just a competition; it was a day of joy, friendship, and positive energy for students, teachers, and parents alike.






No comments