‘युथ फॉर रिव्होल्यूशन’ ग्रुपचा वर्धापन दिन उत्साहात साजरा
‘युथ फॉर रिव्होल्यूशन’ ग्रुपचा वर्धापन दिन उत्साहात साजरा
नागपूर : शिवराय, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आधार घेत मागील दहा वर्षांपासून सामाजिक आणि शैक्षणिक परिवर्तनासाठी अखंड कार्य करणाऱ्या ‘युथ फॉर रिव्होल्यूशन’ ग्रुपचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. वर्षातील ३६५ दिवस सामाजिक बदलासाठी काम करणारी ही संस्था आज युवा शक्तीचे प्रभावी व्यासपीठ ठरली आहे.
संस्थेतर्फे अनेक उपक्रमांना गती देण्यात आली आहे. गावागावातील बंद पडलेल्या बौद्ध विहारांचे ग्रंथालयांमध्ये रुपांतर, मोफत करिअर मार्गदर्शन कार्यक्रमांचे आयोजन, विविध महापुरुषांच्या जयंतीचे महत्त्व जनमानसापर्यंत पोहोचवणे, दीक्षाभूमी आणि चिचोली येथे धम्मचक्र अनुवर्तन दिनानिमित्त ‘एक प्रश्न – एक उत्तर – एक मोफत पुस्तक’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणे, तसेच वेलतूर भीममेळ्यात शैक्षणिक कार्यक्रम व वार्षिक कॅलेंडर प्रकाशन अशा असंख्य उपक्रमांद्वारे संस्थेने सातत्याने समाजजागृती केली आहे.
वर्धापन दिनानिमित्त अनेक मान्यवरांनी व्हिडिओ संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्या. त्यात माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, दिग्दर्शक शैलेश नरवडे, मराठी अभिनेते भूषण मंजुळे, लोकशाहीर चरण जाधव, मा. अमर बागडे, मा. रोशनभाऊ राऊत, मा. कोमल देशभ्रतार, मा. मयुरा सावी, अभियंता अमित रामराजे आणि मा. कुंदन रामटेके यांचा समावेश होता. मान्यवरांनी संस्थेच्या दशकभराच्या अविरत सामाजिक योगदानाचे कौतुक करत भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मच्छिंद्र गायकवाड, जितेंद्र गायकवाड, गजानन पानतावणे, सागर बागडे, अतुल देशभ्रतार, मयूर गायकवाड, आकाश खोब्रागडे, सुबोध बोडेले, तसेच अर्चना राऊत, शालिनी मेश्राम आणि चंदा वाघमारे यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या माननीय तक्षशीला वाघधरे मॅडम यांनी युवकांच्या संघटनेचे महत्त्व, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि परिवर्तनात युवा पिढीची भूमिका यावर सखोल मार्गदर्शन केले. “युवकांनी संघटित होऊन कार्य केले तर समाज परिवर्तनाची गती अनेकपटीने वाढते,” असे त्यांनी सांगितले. वर्धापन दिनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडत असून, ‘युथ फॉर रिव्होल्यूशन’ ग्रुपच्या पुढील सामाजिक वाटचालीस नवी दिशा आणि प्रेरणा मिळाली आहे.

No comments