Breaking News

राणी दुर्गावती चौकमध्ये बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी

 

राणी दुर्गावती चौकमध्ये बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी

महान क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या पुतळ्यास अभिवादन करताना डॉ.अनिता भुते 

नागपूर, १५ : राणी दुर्गावती चौक येथील राज एज्युकेशन सोसायटी द्वारा संचलित  सेंट एम. बी. हायस्कूलतर्फे  महान क्रांतिकारक बिरसा मुंडा यांची जयंती आज मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त सर्वप्रथम राणी दुर्गावती चौकातील बिरसा मुंडा यांच्या पुतळ्यास  मुख्याध्यापिका डॉ. अनिता भुते यांच्या हस्ते माल्यार्पण  करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी महान क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या जीवनकार्यावर आधारित प्रभावी भाषणे सादर केली. यामध्ये मास्टर रिषित सुनील अंबादे, मास्टर राज संतोष शाहू आणि कु. तनिष्का अमरदीप मेश्राम या विद्यार्थ्यांचा समावेश होता. त्यांच्या भाषणांनी उपस्थितांना बिरसा मुंडा यांच्या संघर्षाची आणि बलिदानाची आठवण करून दिली. शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. अनिता भुते यांनी विद्यार्थ्यांना महान क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या जीवन कार्याचा सखोल परिचय देत मोलाचे मार्गदर्शन केले आणि त्यांच्या आदर्शांचे पालन करण्याचा संदेश दिला. या कार्यक्रमाला हायस्कूलच्या पर्यवेक्षिका रोमा नंदेश्वर, श्रुती गेडाम, अजय रोकडे, चेतन वर्मा, मनोज नंदनवार, मनीष देवगडे, रीना वरघट, स्वाहा अर्जितवार यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक-शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुयोग्य आणि प्रभावी संचालन मनीषा कुंभलवार यांनी केले. हा संपूर्ण जयंती कार्यक्रम अतिशय शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.यावेळी शाळेतील सर्व शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित होते.  


 



No comments