Breaking News

ज्येष्ठ समाजसेविका शशीप्रभा शाहू यांचे निधन

 

ज्येष्ठ समाजसेविका शशीप्रभा शाहू यांचे निधन

नागपूर,ता.३ :  वैभवलक्ष्मी बहुउद्देशीय महिला सामाजिक संस्थेच्या संस्थाध्यक्ष आणि गिट्टीखदान येथील टैगोर मेमोरियल हायस्कुल आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कॉलेजच्या वरिष्ठ लिपिक  शशीप्रभाजी गजेंद्र शाहू यांचे  आकस्मिक व दुःखद निधन झाले. त्या ६० वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाने नागपूरच्या सामाजिक आणि शिक्षण क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.  

शशीप्रभा शाहू या ज्येष्ठ समाजसेविका म्हणून परिचित होत्या. त्यांनी महिला सक्षमीकरण आणि शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान दिले. त्यांचे कार्य अत्यंत तळमळीचे आणि प्रेरणादायी होते.  मानकापूर मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार  करण्यात आले.  त्यांच्या पश्चात संपूर्ण शाहू परिवार, शर्मा परिवार आणि शिक्षण क्षेत्राला मोठी हानी पोहोचली आहे. विविध संस्था आणि मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

Senior social worker Shashiprabha Shahu passes away 

Nagpur, Date 3: Shashiprabhaji Gajendra Shahu, president of Vaibhav Lakshmi Multipurpose Women's Social Organization and senior clerk of Arts, Commerce, Science College, Gittikhadan, passed away suddenly and tragically. She was 60 years old. Her death has spread grief in the social and education sector of Nagpur. Shashiprabha Shahu was known as a senior social worker. She made great contributions in the field of women empowerment and education. Her work was very heartfelt and inspiring. The last rites were performed at Mankapur Mokshadham. The entire Shahu family, Sharma family and the education sector have suffered a great loss after her death. Various organizations and dignitaries have expressed deep grief over her death.

No comments