दीक्षाभूमी: आता धम्मासोबत 'विज्ञान' सुद्धा ! स्टॉल २६६ वरून मुलांना मिळणार वैज्ञानिक दृष्टिकोन
दीक्षाभूमी: आता धम्मासोबत 'विज्ञान' सुद्धा !
स्टॉल २६६ वरून मुलांना मिळणार वैज्ञानिक दृष्टिकोन

विद्यार्थिनींना माहिती देताना डॉ. जागृती मेश्राम

नागपूर,ता.२ : नागपूर येथील दीक्षाभूमी हे केवळ ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळ नसून, ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या वैज्ञानिक दृष्टिकोन आणि चिकित्सक बुद्धीच्या महान विचारांचे केंद्र आहे. बाबासाहेबांनी नेहमीच शिक्षण आणि विज्ञानावर आधारित समाजाची संकल्पना मांडली. या विचारांचा पाया म्हणजे, भगवान बुद्धांनी दिलेला 'विज्ञान आणि तर्कशुद्धता' यांचा संदेश. बुद्धांनी लोकांना कोणत्याही गोष्टीवर डोळे झाकून विश्वास न ठेवता, ती स्वतःच्या बुद्धीने तपासावी, हा आग्रह धरला. बाबासाहेबांनी याच वारसाला पुढे नेत, समाजाला अंधश्रद्धेतून बाहेर काढून प्रगतीच्या मार्गावर आणण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन आत्मसात करण्याचे आवाहन केले.
आजच्या जगात, मुलांना लहानपणापासूनच वैज्ञानिक दृष्टिकोन देणे, हे अत्यंत महत्त्वाचे आहे. केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न राहता, मुलांनी 'कसे आणि का?' या प्रश्नांची उत्तरे शोधायला शिकले पाहिजे. हाच उद्देश पूर्ण करण्यासाठी, दीक्षाभूमीवर एक अनोखा आणि महत्त्वाचा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
स्टॉल क्रमांक २६६ येथे 'भीमाच्या लेकरांना' म्हणजेच नवीन पिढीला विज्ञान प्रयोगांची आणि नवीन गोष्टी शिकण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. या स्टॉलवर मुलांना विज्ञानाचे मूलभूत नियम करून शिकण्याच्या (Learning by Doing) पद्धतीने समजावून सांगितले जातील.
या उपक्रमामुळे दीक्षाभूमीच्या दर्शनासाठी येणाऱ्या लहानग्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वैचारिक वारसा प्रत्यक्ष कृतीतून समजून घेता येईल. वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे म्हणजे केवळ विज्ञानाचे धडे घेणे नव्हे, तर आयुष्यातील प्रत्येक समस्येकडे तर्कशुद्ध आणि वास्तववादी दृष्टीने पाहण्याची सवय लावणे होय. हा स्टॉल मुलांना याच दिशेने प्रोत्साहित करेल आणि भविष्यात ते डॉ. आंबेडकरांच्या स्वप्नातील बुद्धिवादी आणि प्रगतीशील समाजाची निर्मिती करण्यात सक्रिय योगदान देतील.
हा उपक्रम म्हणजे बाबासाहेबांच्या 'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा' या संदेशातील 'शिका' या भागाला दिलेले मूर्त स्वरूप आहे. या संधीचा लाभ घेऊन, मुलांना वैज्ञानिक विचारधारेची खरी ताकद समजून घेता येईल.
Nagpur, 2: Deekshabhoomi in Nagpur is not only a historical and religious place, but it is also the center of the great ideas of scientific approach and medical wisdom given by Dr. Babasaheb Ambedkar. Babasaheb always presented the concept of a society based on education and science. The foundation of these ideas is the message of 'science and rationality' given by Lord Buddha. Buddha insisted that people should not blindly believe in anything, but should examine it with their own intellect. Babasaheb, taking this legacy forward, appealed to the society to adopt a scientific approach to get out of superstition and put it on the path of progress.
In today's world, it is very important to give children a scientific approach from an early age. Instead of being limited to book knowledge alone, children should learn to find answers to the questions 'how and why?'. To fulfill this purpose, a unique and important initiative has been organized at Deekshabhoomi.
At stall number 266, 'Bhima's children' i.e. the new generation will get a golden opportunity to do science experiments and learn new things. This stall will teach children the basic principles of science through the method of Learning by Doing.
This initiative will enable children who come to visit the Deekshabhoomi to understand the ideological legacy of Dr. Babasaheb Ambedkar through practical action. Developing a scientific approach is not just about taking science lessons, but also about instilling the habit of looking at every problem in life in a rational and realistic way. This stall will encourage children in this direction and in the future they will actively contribute to creating a rational and progressive society as dreamed by Dr. Ambedkar.
This initiative is the embodiment of the 'Learn' part of Babasaheb's message of 'Learn, Organize and Struggle'. By taking advantage of this opportunity, children will be able to understand the true power of scientific thinking.
No comments