Breaking News

श्रीमती जाईबाई शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात


माजी आमदार डॉ. मिलिंद माने यांच्या हस्ते सन्मानचिन्ह स्वीकारताना चिमुकली विद्यार्थिनी
 

नागपूर, ता.२७ : नारी रोड समता नगर येथील  महाकरूनिक तथागत शिक्षण संस्था अंतर्गत संचालित श्रीमती जाईबाई हिंदी /इंग्लिश प्राथमिक  शाळेच्या प्रांगणात  प्रजासत्ताक दिन  उत्साहात साजरा करण्यात आला.  

      यावेळी   कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी आमदार डॉ. मिलिंद माने, शाळेचे  संचालक मोरेश जांभुलकर, हेमा जांभुलकर, मुख्याध्यापिका जयश्री सोनुले,भागवत लांडगे,वरिष्ठ शिक्षक वामन साखरे,संस्थेचे अध्यक्ष प्रवीण मानवटकर उपस्थित होते. शाळेतील विद्यार्थ्यांनी  सांस्कृतिक कार्यक्रमात देश भक्तीगीत, नाट्य, कविता सादर केले.  शाळेत आयोजित केलेल्या विज्ञान प्रदर्शनीत स्पर्धेत    प्रथम  क्रमांक  मयांक शेंडे, विशाखा शेंडे, यांना थर्मल इलेट्रॉनिक जनरेटर,  प्रथम क्रमांक  प्रज्ञा राऊत, काजल पटले यांना  सूर्यग्रहण चंद्र ग्रहण , प्रथम क्रमांक करण राऊत यांना  कागज के फुल  प्रोजेक्टकरिता विजेत्यांना विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्याहस्ते गौरविण्यात आले.  कार्यक्रमाचे संचालन रीना कावळे, सुप्रिया बिसेन यांनी केले. आभार लिकेश बाडूले यांनी मानले.  यावेळी  शाळेतील शिक्षकवृंदसह कर्मचारी  उपस्थित होते.   

Republic Day was celebrated

Nagpur, 27th: Republic Day was celebrated in the premises of Mrs. Jaibai Hindi/English Primary School run under Mahakaruni Tathagata Shikshan Sanstha at Nari Road Samta Nagar.

On this occasion, the chief guest of the program was former MLA Dr. Milind Mane, School Director Moresh Jambhulkar, Hema Jambhulkar, Headmistress Jayashree Sonule, Bhagwat Landge, Senior Teacher Vaman Sakhre, Institution President Praveen Manavatkar were present. Students of the school presented patriotic songs, plays, poems in the cultural program. Mayank Shende, Vishakha Shende, first runner-up for Thermal Electronic Generator, first runner-up Pragya Raut, Kajal Patle for Solar Eclipse, first runner-up Karan Raut for Paper Ke Full project were felicitated by dignitaries in the science exhibition competition organized by the school. The program was moderated by Reena Kawle, Supriya Bisen. Thanks Likesh Badule. On this occasion, teachers and staff of the school were present.

No comments