सुरेल बुद्ध गीतांतून भगवान बुद्धांना अभिवादन : N7 News Voice
संविधान चौकात सकाळच्या प्रहरी बुद्ध गीतांनी वातावरण आनंददायी
नागपूर : तथागत भगवान गौतम बुद्धांच्या २५८६ व्या जयंतीनिमित्त संविधान चौकात 'बुद्ध पहाट' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सुरेल बुद्ध गीतांमधून भगवान बुद्धांना अभिवादन करण्यात आले.
सम्यक थिएटर, मातोश्री महानंदा या महिला बहुउद्देशीय संस्था, युवा मॅज्युएट फोरम आणि संविधान फाऊंडेशनच्या वतीने 'बुद्ध पहाट'चे आयोजन करण्यात आले. भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांनी भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण केले. त्यानंतर त्यांनी उपस्थित बौद्ध उपासक, उपासिकांना त्रिशरण पंचशील दिले.
कार्यक्रमाची सुरुवात छाया वानखेडे यांच्या 'वाटे युगायुगाचा अंधार दूर झाला' या गीताने झाली. सकाळच्या प्रहरी बुद्ध गीतांनी वातावरण आनंददायी व प्रफुल्लीत केले. अहिंसा तिरपुडे यांनी गायलेल्या 'अमृत वाणी ही बुद्धाची ऐक देऊनी 'ध्यान' या गीताला रसिकांनी दाद मीना राव यांनी येथे समानतेचा तो दीप पाजळोनी', भोजराज मेश्राम यांनी 'प्रथम नमो गौतमा तुला हो' या गीताला उपासकांनी दाद दिली. त्यानंतर गायक कलावंतांनी 'जीवनात या मंदिर बांधा, पूजा समतेची, 'भारत भू के मिट्टी में हम गौतम नाम बसायेंगे', 'बुद्ध ही बुद्ध है, 'माझ्या भीमाची पुण्याई', 'तुला वंदनेची फुले वाहताना' ही गीते सादर करून वातावरण प्रसन्नमय केले. त्यानंतर "मी असा तो तसा हे नको मानवा', 'तुला ज्ञान सूर्या आम्ही प्रार्थतो या गीतांना टाळ्यांचा कडकडाट झाला. छाया वानखेडेंच्या 'घबराये जब मन अनमोल' या गीताने बुद्ध पहाटच समारोप झाला.
Salutations to Lord Buddha through melodious Buddha songs
Constituent Chowk: The atmosphere is pleasant with the songs of the Sentinel Buddha in the morning
Nagpur: On the occasion of the 2586th birth anniversary of Tathagata Lord Gautama Buddha, 'Buddha Pahat' program was organized at Constituent Chowk. Lord Buddha was greeted with melodious Buddha songs.
'Buddha Pahat' was organized by Samyak Theatre, Matoshree Mahananda Women's Multi-Purpose Organization, Yuva Mature Forum and Constitution Foundation. By Bhadanta Arya Nagarjuna Surai Sasai Lord Buddha and Dr. Flowers were offered to the image of Babasaheb Ambedkar. After that he offered Trisharan to the Buddhist worshipers and devotees present. Panchsheel was given.
The program started with Chhaya Wankhede's song 'Wate Yuga Yuga Cha Andahar Door Jala'. Morning Sentinel Buddha songs made the atmosphere pleasant and cheerful. Ahimsa Tirpude's song 'Amrit Vani Hi Aik Chi Dudeni Dhyan' sung by Ahimsa Tirpude was praised by fans.
To Deep Pajloni', Bhojraj Meshram's song 'Pratham Namo Gautama Tula Ho' was appreciated by the worshippers. After that, the singers enlivened the atmosphere by performing the songs 'Jeenaat Ya Mandir Bha, Pooja Samatechi', 'Bharat Bhu Ke Mitti Mein Hum Gautam Naam Basayenge', 'Buddha Hi Buddha Hai, 'Mazhya Bhimachi Punyai', 'Tula Vandanechi Phule Vaahtana'. After that, the songs "Mi asa to tasa he nako manava", "Tula Gyan Surya Mee Prarthoto" got thunderous applause. Chaya Wankhede's song "Ghabraye Jab Man Anmol" concluded Buddha's morning.
No comments