तेजस संस्थातर्फे डीबीएच्या नवनियुक्त सभासदांचा सत्कार
कामठी : तेजस बहुउद्देशीय संस्थेतर्फे नागपूर जिल्हा न्यायालय संघटेनचे नवनियुक्त अध्यक्ष रोशन बागडे व त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाला जिल्हा न्यायालय संघाचे माजी अध्यक्ष कमल सतुजा,विदर्भवादी नेते सुनील चोखारे, माजी आमदार उपेंद्र शेंडे, संस्थेचे मार्गदर्शक विदर्भ गोल्डचे समाचारचे संचालक संपादक एम.ए.जब्बार, संस्थेचे कायदेशीर सल्लागार अधिवक्ता विलास राऊत, तेजस संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर अरगुलेवार, उपाध्यक्ष देविदास पेटरे, सदस्य नरेश शिंदे, ज्येष्ठ समाजसेवक भाऊ गणेश फुलसुंगे उपस्थित होते.
जावेद यांच्याहस्ते २० किलो वजनाचा पुष्पहार शाल, श्रीफळ, देऊन जिल्हा न्यायालय संघटनेचे नवनियुक्त अध्यक्ष रोशन बागडे, सचिव , कोषाध्यक्ष व इतर सभासदांचा भव्य सत्कार करण्यात आला. डी.बी.ए.चे माजी अध्यक्ष अधिवक्ता कमल सतुजा आणि तेजस संस्थेच्या माध्यमातून वकिलांसाठी आणि न्यायालयात काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर, तेजस संस्थेच्या माध्यमातून लवकरात लवकर नागपूर जिल्हा न्यायालयात घेणार असल्याचे अरगुलेवार यांनी सांगितले.
Felicitation of newly appointed members of DBA by Tejas Sanstha
Kamthi : Tejas multi-purpose organization felicitated the newly appointed president of Nagpur District Court Organization Roshan Bagde and his office bearers. On this occasion, former President of District Court Association Kamal Satuja, Vidarbha leader Sunil Chokhare, former MLA Upendra Shende, guide of the organization Vidarbha Gold Director Editor of Samachar MA Jabbar, Legal Advisor of the organization Vilas Raut, President of Tejas Institute Chandrasekhar Argulewar, Vice President Devidas Petre, Member Naresh Shinde, senior social worker Brother Ganesh Phulsunge were present. The newly appointed President Roshan Bagde, Secretary, Treasurer and other members of the District Court Association were felicitated grandly by giving a 20 kg wreath shawl, Shreefal by the hands of Javed. Argulewar said that DBA former president Advocate Kamal Satuja and through Tejas Sansthan will conduct a health check-up camp for lawyers and officers and employees working in the court, through Tejas Sansthan at Nagpur District Court as soon as possible.
No comments