स्वातंत्र्य संग्राम सैनिकांचा इतिहास मोबाईल अॅप वर | N7 News Voice
राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित जनजागृती कार्यक्रम
नागपूर,ता. ५ : स्वातंत्र्य संग्राम सैनिकांचा इतिहास सांगणारी माहिती विद्यार्थ्याना मोबाईल ॲपद्वारे सहजरित्या उपलब्ध करुन देण्यासाठी भारत सरकारने मोबाइल गेम्स अॅप विकसित केले आहे. याबाबतच्या जनजागृती मोहिमेला आजपासून सुरुवात करण्यात आली आहे.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूरतर्फे नागपूर माध्यमिक विद्यालय, नागपूर यांच्या सहयोगाने पोलिस लाईन टाकळी येथे नागपूर माध्यमिक विद्यालयात आजादी क्वेस्ट मॅच 3 कोडे आणि आजादी क्वेस्ट : भारताचे वीर नायक मोबाईल गेम्स अँप विशेष जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी नागपूर प्रदेश एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष किशोर जिचकार, मंचावर केंद्रीय संचार ब्युरो, नागपूरचे प्रभारी सहायक संचालक हंसराज राऊत, शाळेचे मुख्याध्यपक विनोद पुरकाम उपस्थित होते.
यावेळी श्री. हंसराज राऊत यांनी अॅप विषयी माहिती देतांना सांगितले की, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून भारत सरकारने भारताच्या स्वातंत्र्य लढ्यावर आधारीत आजादी क्वेस्ट हे मोबाईल अॅप विकसित केले आहे. भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या कथा आणि महत्वपूर्ण प्रसंग यांचे दर्शन घडविणारे प्रसंग प्रश्नोत्तराच्या स्वरूपात यात मांडण्यात आले आहेत. अँप मध्ये दिलेली स्वातंत्र्य लढयाची माहिती प्रकाशन विभाग आणि भारतीय इतिहास संशोधन परिषदेने तयार केली आहे. झिंगा इंडियाच्या सहकार्याने हे अॅप विकसित केले आहे. यातील पहिले दोन गेम्स प्रसिध्द झाले असून मॅच 3 कोडे व भारताचे वीर नायक यांचा समावेश आहे. मंच 3 कोडे यामध्ये 1857 ते 1947 पर्यंतचा भारताच्या स्वातंत्र्याचा इतिहास मांडण्यात आला आहे. एकूण 495 गेम्स लेवल्स आहेत. भारताचे वीर नायक यामध्ये प्रश्नमंजुषा स्वरूपात भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील नायकांची माहिती समावेश आहे. यात एकूण 750 प्रश्नांचा समावेश आहे. आजादी क्वेस्ट मॅच 3 कोडे आणि आजादी क्वेस्ट : भारताचे वीर नायक हे दोन अॅप गुगल प्ले स्टोर वरून डाऊनलोड करता येऊ शकेल. विद्याथ्र्यांनी या अँप चा वापर करून मोबाईल गेमद्वारे स्वातंत्र्य यातील नायकांचा इतिहास जाणून घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी जिचकार म्हणाले की, मोबाईल गेम्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घालण्यासाठी भारत सरकारने खूप छान उपक्रम सुरू केला आहे. विद्यार्थ्यांनी या अँपचा लाभ घेऊन स्वातंत्र्य लढ्यातील इतिहासाची माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
संचालन व प्रास्ताविक नितीन बर्गे यांनी केले. आभार नलिनी गेडाम यांनी मानले.
History of freedom struggle soldiers now on mobile app
Public awareness program on National Teacher's Day
Nagpur, 5 : Government of India has developed mobile games app to make information about the history of freedom struggle soldiers easily available to students through mobile app. The awareness campaign in this regard has been started from today. Azadi Quest Match 3 Puzzle and Azadi Quest : Veer Nayak Mobile Games of India at Nagpur Secondary School at Police Line Takli in association with Nagpur Secondary School, Nagpur by Ministry of Information and Broadcasting, Central Bureau of Communications, Government of India, Regional Office, Nagpur on the occasion of Amrit Mahotsav of Independence and National Teachers' Day A special awareness program was organized. Nagpur Pradesh Education Society President Kishore Jichkar presided, Central Bureau of Communications, Nagpur in-charge Assistant Director Hansraj Raut, School Principal Vinod Purkam were present on the stage.
At this time Giving information about the app, Mr.Hansraj Raut said that as a part of the Amrit Mahotsav of Independence, the Indian government has developed a mobile app Azadi Quest based on India's freedom struggle. Stories and important events of India's freedom struggle are presented in question and answer format. The Freedom Struggle information provided in the app has been prepared by the Publications Department and the Indian Council of Historical Research. This app is developed in association with Zynga India. The first two of these games have become popular and include Match 3 Puzzle and Veer Nayak of India. Manch 3 puzzle presents the history of India's independence from 1857 to 1947. There are total 495 game levels. Veer Nayak of India contains information about the heroes of India's freedom struggle in the form of a quiz. It consists of total 750 questions. Azadi Quest Match 3 Puzzle and Azadi Quest : Veer Nayak of India are two apps that can be downloaded from Google Play Store. He appealed to the students to learn the history of freedom heroes through mobile games using this app.
On this occasion, Jichkar said that the Government of India has started a very good initiative to increase the knowledge of students through mobile games.
He appealed to the students to take advantage of this app to learn about the history of the freedom struggle. Conducted and introduced by Nitin Berge. Thanks Nalini Gedam.
No comments