 |
गुणवंत प्राप्त विद्यार्थ्यांचे सत्कार करतांना मुख्याधापिका अर्चना पन्नासे |
 |
एकता भैसवार |
नागपूर : झिंगाबाई टाकळी येथील गोपाल एज्युकेशन सोसायटी व्दारा संचालीत भारतीय कृषी विद्यालयातील एकता भैसवार या विद्यार्थिनीने १० वी बोर्डाच्या परीक्षेत ८८.४० टक्के यश संपादित करून शाळेतून प्रथम आली आहे. 2021-22 शैक्षणिक सत्रात कोरोना काळानंतर होणाऱ्या पहील्या परीक्षेमध्ये 84 विद्यार्थी बोर्ड परीक्षेला बसलेले होते त्यापैकी 80 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शाळेचा निकाल ९५.२३ टक्के लागला. त्यापैकी 62 विद्यार्थी प्रथम श्रेणीत व 18 द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण होऊन शाळेचे नाव उज्वल केले. या यशाचे श्रेय विद्यार्थ्यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका व आपल्या गुरुजनाना दिले.
या बोर्ड परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक एकता भैसवार ( 88.40%), द्वितीय क्रमांक श्रुती बजाईत (84.80%) व तृतीय क्रमांक श्रेया दोरखंडे (82.60%), निकीता फाले (82%), श्रावणी गोमासे (81.40%) यश पेटकर (81.20% ) खुशी नागमोथे (80.80%) व अथर्व सोनवाने (80%) यानी नेत्रदिपक यश संपादन केले. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे व गुणप्राप्त विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब पन्नासे , सचिव राकेश पन्नासे, मुख्याध्यापिका अर्चना पन्नासे , पर्यवेक्षीका दिपीका तुपकर व विद्यालयातील सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले.
No comments