Breaking News

सेंट रॉबेन पब्लिक स्कुलमध्ये वाहतूक नियमांची कार्यशाळा

  

विद्यार्थ्यांना  मार्गदर्शन करतांना वाहतूक  पोलीस निरीक्षक मनीष बन्सोड,
अनिल चांदुरकर, शाळेचे संचालक जोतिराब बारसागडे  

नागपूर :  उत्तर नागपुरातील जरीपटका येथील  न्यू चैतन्य व सेंट रॉबेन पब्लिक स्कुल अँड ज्युनिअर कॉलेज येथे  इंदोरा पोलीस वाहतूक शाखातर्फे  ' वाहतुकीचे नियम व कायदा ' या विषयी एक दिवसीय  कार्यशाळेचे  आयोजन करण्यात आले होते.  यावेळी  कार्यशाळेचे  प्रमुख पाहुणे इंदोरा पोलीस वाहतूक विभागाचे  पोलीस निरीक्षक मनीष बन्सोड, पोलीस हवालदार  अनिल चांदुरकर, शाळेचे संचालक जोतीराव बारसागडे   उपस्थित होते.  
    वर्षाला  सुमारे तीन लक्ष अपघात होत असून सरासरी दिड लक्ष लोक आपले प्राण गमवावे  लागले  यात अठरा ते तीस वर्षे वयोगटातील पुरुष-महिलांचे प्रमाण अधिक असून घरातील कमावत्या व्यक्तीच्या अपघाती म्रुत्युमुळे लाखो लोक अनाथ-निराधार झाले आहे.   शासनाने ठरवून दिलेल्या वाहन कायद्याचे पालन केल्यास  संभाव्य जीवित हानी टाळता येते  असे  इंदोरा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मनीष बन्सोड  यांनी सांगितले.  शालेय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना  वाहतुकीचे  नियम व कायदा  यांचे  संपूर्ण  माहिती दिल्यास  अपघाताचे  प्रमाण कमी करता येईल असे मत  जोतीराव बारसागडे  यांनी व्यक्त केले.  अनिल चांदुरकर यांनी विद्यार्थ्यांना  वाहतूक नियमांची व दंडाची उपयुक्त माहिती सांगितली. यावेळी शाळेचे संचालक  जोतीराव बारसागडे, मुख्याध्यापिका धनश्री बारसागडे, अभिग्या बागडे, पर्यवेक्षिका रिया डोईफोडे प्रामुख्याने उपस्थित होते.  कार्यक्रमाचे संचालन कोमल सोनकांबळे यांनी केले. आभार बारसागडे  यांनी  मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिमल रामटेके, वैशाली सिडाम, हिलू हरिनखेडे, रुचा खोब्रागडे, रेखा रुईकर, जुही खोब्रागडे, चेतना चनकापुरे, करूणा कोटमवार, पराते, तेजश्वीनी बांगडे, रोहित मेश्राम, नम्रता सेवतकर यांनी परिश्रम घेतले.   

Traffic Law Workshop at St. Robben Public School

Nagpur, Tal. 5: A one day workshop on 'Traffic Rules and Laws' was organized by Indora Police Traffic Branch at New Chaitanya and St. Robben Public School and Junior College, Jaripatka, North Nagpur. Chief guests of the workshop were Indore Police Traffic Police Inspector Manish Bansod, Police Constable Anil Chandurkar, School Director Jotirao Barsagade.
    About three lakh accidents take place every year and an average of one and a half lakh people have lost their lives. The proportion of men and women in the age group of 18 to 30 years is high. Indore Transport Branch Police Inspector Manish Bansod said that the possible loss of life could be avoided by following the Vehicle Act prescribed by the government. Jotirao Barsagade expressed the view that the number of accidents can be reduced if the students studying in school are given complete information about traffic rules and regulations. Anil Chandurkar gave useful information to the students about traffic rules and penalties. The school director Jotirao Barsagade, headmistress Dhanashree Barsagade, Abhigya Bagade, supervisor Riya Doiphode were present on this occasion. The program was conducted by Komal Sonkamble. Thanked by Barsagade. Parimal Ramteke, Vaishali Sidam, Hilu Harinkhede, Rucha Khobragade, Rekha Ruikar, Juhi Khobragade, Chetna Chanakapure, Karuna Kotamwar, Parate, Tejashwini Bangade, Rohit Meshram and Namrata Sevatkar worked hard to make the event a success.

Photo: Traffic Police Inspector Manish Bansod, Anil Chandurkar, School Director Jotirab Barsagade guiding the students

No comments