युवकांमध्ये राष्ट्र प्रेमाविषयी जनजागृती : N7 News Voice
माहिती आणि प्रसारण मंत्रालयातील प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो, पुणेच्या अधिनस्त क्षेत्रिय लोकसंपर्क ब्युरो, कोल्हापूरचा उपक्रम
राष्ट्रीय युवा महोत्सव आणि कोविड लसिकरण जनजागृती मोहिमेचा जिल्हाधिका-यांच्याहस्ते शुभारंभ
|
कोल्हापूर, ता.१२ : स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त २५ वे राष्ट्रीय युवा महोत्सव आणि कोविड १९ लसिकरण या विषयावर कोल्हापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यात जनजागृतीसाठी तयार केलेल्या फिरते ऑटोरिक्षा प्रचार प्रसार मोहिमेचा शुभारंभ आज जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे कोल्हापूर विभागाचे उपसंचालक डॉ. संभाजी खराट, क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो, कोल्हापूर विभागाचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत, माहिती उपसंचालक कार्यालयाचे सहायक संचालक फारूख बागवान, माहिती सहायक पवार प्रामुख्याने उपस्थित होते.
माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो, पुणे यांच्यावतीने हे उपक्रम आज राज्यातील एकूण ११ जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो, कोल्हापूरच्यावतीने स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त २५ वे राष्ट्रीय युवा महोत्सव आणि कोविड १९ लसिकरण या विषयावर कोल्हापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यात फिरते ऑटोरिक्षाद्वारे प्रचार प्रसार मोहिम राबविण्यात येत आहे.
या उपक्रमांतर्गत लसिकरणाबाबतची माहिती, आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत देशासाठी बलिदान देणा-या वीर महापुरूषांची माहिती लोकांना देण्यात येणार आहे. तसेच राष्ट्रीय युवा महोत्सवांतर्गत युवकांच्या मनात महापुरूषांची प्रेरणा रूजविण्याचे कार्य, तसेच सक्षम भारताची निर्मिती करण्यासाठी युवकांमध्ये राष्ट्र प्रेमाविषयी जनजागृती निर्माण करणे, जगात भारताचे नाव पुढे नेण्यासाठी नव युवकांद्वारे करण्यात येणारे विविध नवनविन प्रयोग, विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळांमध्ये उत्कृष्ठ कामगिरी करून देशाचे नाव कसे उज्वल करण्यासाठी प्रेरीत करण्याकरीता जिल्ह्यातील युवकांमध्ये जनजागृती निर्माण केली जात आहे.
सदर मोहिमेला उपसंचालक माहिती कार्यालय, कोल्हापूर आणि जिल्हा माहिती कार्यालय, कोल्हापूर यांचे सहकार्य लाभले आहे.
या मोहिमेच्या यशस्वितेसाठी प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो, पुणेचे संचालक प्रकाश मकदुम, उपसंचालक निखील देशमुख यांच्या मार्गदर्शनात क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो, कोल्हापूरचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत, एन.डी. नाळे, विलास शेणवी परिश्रम घेत आहेत.
Awareness about love of nation among the youth
National Youth Festival and Covid Vaccination
District Collector launches public awareness campaign
Initiative of Regional Public Relations Bureau, Ministry of Information and Broadcasting, Regional Public Relations Bureau, Pune, Kolhapur
KOLHAPUR: District Collector Rahul Rekhawar today inaugurated a mobile autorickshaw campaign in various talukas of Kolhapur district on the occasion of 25th National Youth Festival and Covid 19 vaccination on the occasion of Swami Vivekananda's birth anniversary.
On this occasion, the Deputy Director of Kolhapur Division of the Directorate General of Information and Public Relations, Dr. Sambhaji Kharat, Regional Public Relations Bureau, Hansraj Raut, Regional Publicity Officer, Kolhapur Division, Farooq Bagwan, Assistant Director, Office of the Deputy Director of Information, Pawar were present.
The initiative is being implemented by the Ministry of Information and Broadcasting, Regional Public Relations Bureau, Government of India, Pune in a total of 11 districts of the state today. As a part of this, on behalf of Regional Public Relations Bureau, Kolhapur, on the occasion of 25th National Youth Festival and Covid 19 Vaccination on the occasion of Swami Vivekananda's birth, a publicity campaign is being carried out in various talukas of Kolhapur district by autorickshaws.
Under this initiative, information about vaccination, information about the heroic heroes who sacrificed for the country under Azadi Ka Amrut Mahotsav will be given to the people.
As well as inspiring great men in the minds of the youth under the National Youth Festival, creating awareness among the youth about patriotism to create a capable India, various innovative experiments conducted by the youth to make India famous in the world Awareness is being created among the youth of the district for this purpose.
The campaign has the support of Deputy Director Information Office, Kolhapur and District Information Office, Kolhapur.
For the success of this campaign, under the guidance of Regional Public Relations Bureau, Pune Director Prakash Makdum, Deputy Director Nikhil Deshmukh, Regional Public Relations Bureau, Kolhapur Regional Publicity Officer Hansraj Raut, N.D. Nala, Vilas Shenvi are working hard.
No comments