Breaking News

टूव्हीलरच्या धडकेत जयप्रभु लोणारे यांचे निधन


रेल्वे सेवानिवृत्त कर्मचारी जयप्रभु सीताराम लोणारे 

नागपूर : उत्तर नागपुरातील बेझनबाग एम्प्रेसमील कॉटर, प्लॉट,न.१६ येथील रहिवासी रेल्वेसेवानिवृत्त कर्मचारी वयोवृद्ध जयप्रभु सीताराम लोणारे वय ६८ वर्ष यांचे निधन झाले.
     आज दिनांक १३ जानेवारी दुपारी ४ वाजता वैशाली नगर दहन घाट येथे अंतीमसंस्कार करण्यात येईल अशी माहिती मोठा मुलगा सुधीर लोणारे यांनी दिली. मो. ९९७०६४४४८१.  
    वयोवृद्ध जयप्रभू लोणारे नेहमी प्रमाणे जेवण झाल्यानंतर पायदळ फिरायला निघाले घरी परत येत असतांना बुधवार रात्री ११ वाजता जरीपटका कॅनरा बँक  एटीएम पुढे भरधाव वेगाने येणाऱ्या टूव्हीलरने  धडक देताच जयप्रभु लोणारे हे डोक्याच्या भाराने पडल्याने त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्यामुळे   घटनास्थळी मृत्यू झाला. यात टूव्हीलर चालक सुद्धा जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच जरीपटका पोलिसांनी टू व्हीलर चालकास अटक करून  शवविच्छेदनासाठी मेयो रुग्णालयात पाठविण्यात आले. घटनेची माहिती पोलिसांनी मोठा मुलगा सुधीर लोणारे यांना माहिती दिली. संपूर्ण घटनेचा पुढील तपास जरीपटका पोलीस करीत आहे.  
    जयप्रभु लोणारे यांच्या मागे पत्नी,  दोन मुले सुधीर लोणारे, रोशन लोणारे , मुलगी प्रिया ,नातवंडे असा आप्त मोठा परिवार आहे.  

Jayaprabhu Lonare passed away

Nagpur: Retired railway employee Jayprabhu Sitaram Lonare, 68, of Beznbagh Empress Mill Cotter, Plot No. 16 in North Nagpur has passed away.
     The eldest son Sudhir Lonare informed that the funeral will be held on 13th January at 4 pm at Vaishali Nagar Dahan Ghat. Mo. 9970644481.
    Elderly Jayaprabhu Lonare went for a walk after his usual meal. While returning home, Jayaprabhu was hit by a speeding two-wheeler in front of Jaripatka Canara Bank ATM at 11 pm on Wednesday and fell on his head and died on the spot. The two-wheeler driver was also injured. Upon learning of the incident, Jaripatka police arrested the two-wheeler driver and sent him to Mayo Hospital for autopsy. The incident was reported to the elder son Sudhir Lonare by the police. Jaripatka police are investigating the whole incident.
    Jayaprabhu Lonare is survived by his wife, two children Sudhir Lonare, Roshan Lonare, daughter Priya and grandchildren.
      

No comments