Breaking News

थैलेसीमिया-सिकलसेल, एक्सीलेंस सेंटर नागपूरात उभारावे ; राज्यपालांना केली मागणी : डाॅ. विंकी रूघवानी

नागपूर शहरात विदर्भातील सर्व जिल्हयांतील रूग्ण उपचारासाठी येतात.   या रूग्णांना आवश्यक सोयी-सुविधा आजारांवर बोन मॅरो ट्रांसप्लांटेशन हा कायमस्वरूपी उपचार आहे.  या प्रक्रियेची सुविधा एक्सीलेंस सेंटर मध्ये केली जाऊ शकते.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी  यांना  निवेदन देतांना  डाॅ. विंकी रूघवानी यांच्या सोबत आदी मान्यवर

नागपूर, ता. १६ : विदर्भात थैलेसीमिया व सिकलसेल या गंभीर आजाराने ग्रस्त रूग्णांची संख्या अधिक आहे. या रूग्णांना मिळणाऱ्या  सरकारी योजना पर्याप्त नाहीत. या रोगांसाठी काही विशेष प्रतिबंधात्मक उपाय होत नसल्यामुळे नागपूर शहरात थैलेसीमिया व सिकलसेल रोगांसाठी व त्यांच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी सरकारतर्फे एक्सीलेंस सेंटर उभारण्याची मागणी थैलेसीमिया व सिकलसेल सेंटरचे अध्यक्ष डाॅ. विंकी रूघवानी यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना केली.

 या प्रसंगी गडचिरोलीचे सांसद अशोक नेते  मानव सेवा संस्थानचे अध्यक्ष डाॅ. राज वकील सिद्दीकी व प्रोफेसर राकेश कृपलानी उपस्थित होते.
   डाॅ. विंकी रूघवानी यांनी राज्यपालांना सांगितले की, थैलेसीमिया व सिकलसेल हे अत्यंत गंभीर आजार आहेत.  हयाने ग्रस्त रूग्णांना रक्त, महागडी औषधे व रक्त तपासण्या यांची गरज असते.  नागपूर शहरात विदर्भातील सर्व जिल्हयांतील रूग्ण उपचारासाठी येतात.   या रूग्णांना आवश्यक सोयी-सुविधा आजारांवर बोन मॅरो ट्रांसप्लांटेशन हा कायमस्वरूपी उपचार आहे.  या प्रक्रियेची सुविधा एक्सीलेंस सेंटर मध्ये केली जाऊ शकते. तसेच या आजारांच्या प्रतिबंधासाठी आवश्यक तपासण्यांची सोय देखील या सेंटर मध्ये केली जावी. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी थैलेसीमिया व सिकलसेल सेंटर तर्फे दिलेल्या निवेदनावर लवकरच बैठक बोलवून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.

 


No comments