अमरावती विद्यापीठात महाराष्ट्र दिन साजरा
कुलगुरूंचे हस्ते ध्वजारोहण
अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात 1 मे महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिवस व विद्यापीठाचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी ध्वजारोहण केले. याप्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. राजेश जयपूरकर, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख व संवैधानिक अधिकारी उपस्थित होते.
कुलगुरू मार्गदर्शन करतांना म्हणाले, महाराष्ट्र राज्याचा व विद्यापीठाचा स्थापन दिवस 1 मे असून आपल्या विद्यापीठासाठी ती गौरवाची बाब आहे. सर्वच क्षेत्रात महाराष्ट्र राज्याने प्रगती केली आहे. विशिष्ट ध्येयाने, विशिष्ट उद्दिष्टासाठी, नवनिर्माणासाठी विद्यापीठाची स्थापना झाली होती. त्या उद्दिष्ट¬ांच्या पूर्तीसाठी प्रत्येक घटकांचे प्रयत्न व वाटचाल महत्वाचे आहे. विद्यापीठ निर्माण करण्याचे उद्दिष्ट व्यापक आहे, शिक्षणाच्या माध्यमातून समाजनिर्मितीचे कार्य या माध्यमातून होत आहे. ध्येयपूर्ती व यशस्वीतेकडे विद्यापीठाची वाटचाल सुरु असून विद्यापीठाने देशपातळीवर आपला नावलौकिक मिळविला आहे. 1983 ते आतापर्यंतचा विद्यापीठाचा प्रवास यशस्वीपणे चालू असून आपण सर्व त्याच ध्येयाने ध्येयपूर्तीसाठी प्रवास करीत असल्याचे सांगून महाराष्ट्र दिन, विद्यापीठ स्थापना दिवस व आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या त्यांनी शुभेच्छा दिल्यात.
Maharashtra Day celebrations at the University
Flag hoisting by the Vice-Chancellor
Amravati : May 1 Maharashtra State Foundation Day and University Anniversary were celebrated at Sant Gadge Baba Amravati University. At this time, the Vice Chancellor Dr. Muralidhar Chandekar hoisted the flag. On this occasion, Q-Vice Chancellor Dr. Rajesh Jaipurkar, Registrar Dr. Tushar Deshmukh and constitutional officials were present.
While giving guidance, the Vice-Chancellor said that the establishment day of Maharashtra State and University is May 1 and it is a matter of pride for our university. The State of Maharashtra has made progress in all areas. The university was established with a specific goal, for a specific purpose, for innovation. The efforts and efforts of each and every component are important for the achievement of those objectives. The objective of building a university is broad, the work of socialization through education is being done through this. The University is on its way to fulfillment and success and has earned its reputation at the national level. He said that the journey of the university from 1983 to date has been successful and we are all traveling towards the same goal.
-----------------------------------------------
No comments