Breaking News

रत्नागिरी जिल्ह्यात कोविड लसिकरण जनजागृती मोहिमेला शुभारंभ

माहिती आणि प्रसारण मंत्रालयातील प्रादेशिक लोकसंपर्क
ब्युरो, पुणेच्या अधिनस्त क्षेत्रिय लोकसंपर्क ब्युरो, कोल्हापूरचा उपक्रम

रत्नागिरी, : कोविड १९ लसिकरण आणि आत्मनिर्भर भारत या विषयावर रत्नागिरी जिल्ह्यातील विविध तालुक्यात जनजागृतीसाठी तयार केलेल्या बहुमाध्यमी मोबाईल व्हॅनवरील फिरत्या प्रदर्शनाचे तसेच कलापथक मोहिमेचा शुभारंभ जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या हस्ते करण्यात आला. 

याप्रसंगी जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबीता कमलापूरकर, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. एस. के. फुले, क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो, कोल्हापूर विभागाचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत, क्षेत्रीय प्रचार सहायक प्रमोद खंडागळे प्रामुख्याने उपस्थित होते.
      माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो, पुणे यांच्यावतीने हे उपक्रम राबविण्यात येत आहे. यात जागतिक आरोग्य संघटना, युनिसेफ आणि आरोग्य विभाग, महाराष्ट्र यांचे सहकार्य लाभले आहे. या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील ३६ जिल्हयात १६ व्हॅन्स द्वारे फिरते बहुमाध्यमी प्रदर्शन आयोजित करून तसेच कलपथकांच्या माध्यमातून लोकांमध्ये कोविड लसिकरण मोहिम आणि आत्मनिर्भर भारत अभियानाबद्दल जनजागृती निर्माण करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो, कोल्हापूरच्यावतीने रत्नागिरी जिल्ह्यातील विविध तालुक्यातील गावांमध्ये १० दिवस व्हॅनद्वारे फिरते बहुमाध्यमी प्रदर्शनाच्या माध्यमातून ही मोहिम राबविण्यात येत आहे.  
    या उपक्रमांतर्गत लसिकरणाबाबतची माहिती, आत्मनिर्भर भारत अंतर्गत विविध उपक्रम आणि कोविड विषयक नियमांबाबतची माहिती जिल्ह्यातील नागरीकांपर्यंत पोहचविणे, हा या मागील उद्देश आहे. लसिकरणाविषयी असलेले गैरसमज आणि अफवांबाबत जनतेला जागृत करणे, आत्मनिर्भर भारताच्या उभारणीसाठी सरकार करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती फिरत्या बहुमाध्यमी प्रदर्शनाच्या माध्यमातून लोकांना करून देण्यात येणार आहे.
    यावेळी कलापथकातील कलाकारांच्या माध्यमातून कार्यक्रमाचे सादरीकरण करून लोकांपर्यंत जनजागृती संदेश पोहचविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील जनजागृती मोहिमेसाठी जिल्हा आरोग्य विभाग आणि जिल्हा माहिती कार्यालय यांचे सहकार्य लाभले आहे.
     या मोहिमेच्या यशस्वितेसाठी प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो, पुणेचे संचालक संतोष अजमेरा यांच्या मार्गदर्शनात क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो, कोल्हापूरचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत, क्षेत्रीय प्रचार सहायक प्रमोद खंडागळे, एन.डी. नाळे, विलास शेणवी, कलापथकाचे अनंतकुमार साळुंखे व त्यांच्या चमूचे सदस्य परिश्रम घेत आहेत.



Launch of Kovid Vaccination Awareness Campaign in Ratnagiri District

Initiative of Regional Public Relations Bureau, Ministry of Information and Broadcasting, Regional Public Relations Bureau, Pune, Kolhapur

Ratnagiri: District Collector Laxminarayan Mishra inaugurated a mobile exhibition on multi-medium mobile vans prepared for public awareness in various talukas of Ratnagiri district on the topic of Kovid 19 vaccination and self-reliant India.

On this occasion District Information Officer Prashant Daithankar, District Health Officer  Dr. Babita Kamalapurkar, District Surgeon S. K. Phule, Regional Public Relations Bureau, Kolhapur Division Regional Publicity Officer Hansraj Raut, Regional Publicity Assistant Pramod Khandagale were present. It is supported by the World Health Organization, UNICEF and the Department of Health, Maharashtra.

        Under this initiative, a multi-media exhibition is being organized in 36 districts of Maharashtra by 16 vans and awareness is being created among the people about Kovid Vaccination Campaign and Self-Reliant India Campaign. As a part of this, the campaign is being implemented by the Regional Public Relations Bureau, Kolhapur in the villages of various talukas of Ratnagiri district through a 10-day multimedia exhibition by van. The purpose of this initiative is to provide information about vaccination, various initiatives under Self-Reliance India and the rules regarding covid to the citizens of the district. Awareness about the misconceptions and rumors about vaccination, the government's efforts to build a self-reliant India will be made known to the people through a mobile media exhibition.
       Awareness message will be conveyed to the people by presenting the program through the artists of the art troupe. The District Health Department and the District Information Office have been instrumental in the public awareness campaign in the district. their team members are working hard.

No comments