Breaking News

सिध्दार्थ विदयालयात संविधान प्रास्थाविकेचे वाचन



सामुहीक संविधानाच्या प्रास्थाविकेचे वाचन करतांना शिक्षकवृंद

नागपूर, ता. २६ : संपूर्ण देशात संविधान दिन साजरा केला जातो.  स्वातंत्र, समता,बंधुत्व,आणि न्याय या मानवी मुल्ल्यांना महत्व देणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी  देशाला संविधान  अर्पण केले.

 उत्तर नागपुरातील बिनकी नवीन मंगळवारी येथील सिद्धार्थ विद्यालयात संविधान दिनानिमित्त "संविधान प्रास्थाविकेचे" वाचन  करण्यात आले.

यावेळी मुख्याध्यापिका कुमुदिनी चहांदे, माजी मुख्याध्यापक तिहिले , पर्यवेक्षक वसंत पाटिल  यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतीमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले व सामुहीक संविधानाच्या प्रास्थाविकेचे वाचन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन गांजरे यांनी केले .यावेळी प्रामुख्याने  बापू खोब्रागडे,  चंद्रकांत दलाल,  सुरेश चव्हान, जोतिराव बारसागडे , इटनकर, वर्षा पाटिल, बैस   शिक्षक आदी उपस्थित होते.

No comments