उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर असतांना डॉ. नितीन राऊत यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
उत्तर प्रदेशातील जिल्हा आझमगड येथील बांसा गाव येथील दलित सरपंच सत्यमेव जयते उर्फ पप्पू राम यांची गोळी मारून क्रूर हत्या करण्यात आली. उत्तर प्रदेशातील दलितांच्या या वाढत्या हल्ल्याची गंभीर दखल अखिल भारतीय काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाने घेतली आहे.
यासाठी या विभागाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत हे आज उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर असतांना आझमगडच्या सीमेवर उत्तर प्रदेशमधील पोलिसांनी डॉ. नितीन राऊत यांना पुढे जाण्यास मनाई केली असून त्यांना नजरकैद केले आहे. उत्तर प्रदेश पोलिसांच्या या आडमुठे धोरणाला न जुमानता डॉ.नितीन राऊत त्या ठिकाणी रस्त्यावर खाली बसून शांततेच्या मार्गाने ह्या कृत्याचा विरोध करीत आहेत.
While on a tour of Uttar Pradesh, Dr. Nitin Raut arrested by Uttar Pradesh police
Dalit Sarpanch Satyamev Jayate alias Pappu Ram of Bansa village in Azamgarh district of Uttar Pradesh was brutally shot dead. The Scheduled Castes Department of the All India Congress has taken serious note of this increasing attack on Dalits in Uttar Pradesh. For this, the president of this department and the energy minister of Maharashtra, Dr. This is Nitin Raut
While on a tour of Uttar Pradesh today, police in Uttar Pradesh on the border of Azamgarh arrested Dr. Nitin Raut has been barred from proceeding and has been remanded in custody. Despite the intransigence of the Uttar Pradesh Police, Dr. Nitin Raut is peacefully protesting on the streets.
No comments