जाईबाई चौधरी ज्ञानपीठातून एच.एस.सी परीक्षेत कावेरी, ज्योती प्रथम
नागपूर, सदर न्यू कॉलोनी मंगळवारी बाजार येथील जाईबाई चौधरी
ज्ञानपीठ कला - वाणिज्य महाविद्यालयाचा एच एस सी बोर्ड परीक्षा-२०२० निकाल जाहीर झाला. यंदाही १०० टक्के निकालाची परंपरा विद्यालयाने राखली आहे. जाईबाई चौधरी ज्ञानपीठाच्या कला शाखेतून कावेरी चंद्रशेखर कोहळे ९०.९२ टक्के, वाणिज्य शाखेतून ज्योती शंकर मोकलकर ९०.१५ टक्के मिळवून प्रथम क्रमांक पटकवला आहे.
कला- वाणिज्य शाळेतून प्रतीक्षा सहारे ८९ टक्के, निकिता कोठे ८८ टक्के, प्रिया कोलते ८६ टक्के, निकिता टेकाडे ८५ टक्के, समृद्धी तातोडे ८५ टक्के, पूजा वानखेडे ८५ टक्के, अश्विनी राऊत ८४ टक्के, ख़ुशी डोंगरे ८४ टक्के, प्रज्ञा वानखेडे ८३ टक्के, प्रज्ञा ठेपाले ८३ टक्के, वंशिक टेभूर्णे ८३ टक्के, प्रणाली ढाकणे ८३ टक्के, सविता वानखेडे ८२ टक्के, चेतना ताकसांडे ८१ टक्के, हेमलता पराते ८१ टक्के, श्रुती खडसे ८० टक्के, पूजा राऊत ८० टक्के, सिध्या बावरे ८० टक्के अश्या २१ विद्यार्थिनी गुणवत्ता यादीत गौरव प्राप्त केले आहे.
कोरोनाच्या संकट कालीन परिस्थिती नागपूरला सुरक्षित ठेवण्याचे काम प्रशासकीय अधिकारी चांगल्या प्रकारे करू शकतो. स्पर्धा परीक्षेच्या युपीएससी परीक्षा देऊन मला हि मोठा प्रशासकीय अधिकारी व्हायचं आहे अशी इच्छा कावेरी कोहळे विद्यार्थीनी व्यक्त केली. जाईबाई ज्ञानपीठात मेडिटेशनमुळे माझा अभ्यास चांगला झाला . माझा बहीण आणि भाऊ मला रोज सकाळी अभ्यास करायला उठवत असे, तसेच संपूर्ण श्रेय माझ्या शिक्षकांना जातो ज्यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन करून अभ्यासासाठी प्रोत्साहन केले असे ज्योती मोकलकर विद्यार्थीनीने सांगितले.
मोलमजुरी करणारे गोर गरीबाच्या मुले शिक्षण घेत आहे. गुणवत्ता प्राप्त विद्यार्थिनीचे महाविद्यालयाच्या संचालिका प्रभा चौधरी व आचार्य सुधाकर चौधरी , डॉ. शिल्पा पाझरे मार्गदर्शनाखाली कॉलेजचे प्रा. बंडू काटपेलवर, प्रा. सुदत्त मेश्राम, प्रा. सुरेश सुखदेवे, प्रा.अशिया पठाण, प्रा. अनिता रोडगे,प्रा रूपा काकोटे, प्रा. अंजली बैतुले, मुख्याध्यापक राजेश अंबुलकर यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. विद्यार्थाना पुढील वाटचालीसाठी शिक्षकांनी व कर्मचारी यांनी अभिनंदन केले. शिक्षकांचे परिश्रम व पालकांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांचे भविष्य घडवितात असे आचार्य सुधाकर चौधरी यांनी सांगितले.
दुकानात कामकरून समृद्धीने बारावीच्या परीक्षेत ८५ टक्के मिळविले
२०१३ मध्ये वडीलाच्या मृत्यूनंतर डोक्यावरचे छत्र हरविले, आई पाठीशी खंबीर उभी राहून आम्हा तीन बहिणीना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. सर्वात मोठी ताई हि डीएड करीत आहे. संपूर्ण घरची जबाबदारी आईवर आली. एका खाजगी शाळेत आई चपराशी म्हणून कार्यरत आहे. तिला पाच हजार पगार मिळतो. आईला मदत करण्यासाठी समृद्धीला एका कपड्याच्या दुकानांत काम करावा लागला त्यामुळे अभ्यासाला वेळ कमी मिळत असे दोन ते तीन तास अभ्यास केले आहे. शाळेतील शिक्षक संपूर्ण अभ्यास शाळेतच करून घेत असत त्यामुळे कुठलेही खाजगी क्लासेस लावण्याची गरज पडली नाही. मला महाराष्ट्र पोलीस सेवेत मध्ये दाखल होऊन देश सेवा कराची आहे.
-समृद्धी तातोडे, विद्यार्थींनी
--------------------------------------
जाईबाई चौधरी ज्ञानपीठाचा एच एस सी बोर्डाचा-२०२० परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला. याचे श्रेय माझा शिक्षकांना तसेच पालकांना जातो ज्यांनी विद्यार्थ्यांकडून अभ्यास करून घेतात. महाविद्यालयातील सर्व विद्यार्थाना पुढील वाटचालसाठी हार्दीक शुभेच्छा .
- राजेश अंबुलकर, मुख्याध्यापक जाईबाई चौधरी ज्ञानपीठ , सदर
No comments