आम्ही पण माणसे आहोत आमच्या कडे पण लक्ष द्या
#कल्याण #पत्रीपूल #कचोरे येथील #तृतीय #पंथी #लोकांना #अन्नधान्य #वाटप
कल्याण : कल्याण पत्रीपूल कचोरे येथील तृतीय पंथी (हिजडा )समाजातील बहिष्कृत वर्ग. या करोनाच्या महामारीच्या संकटकालीन परस्थिती त त्यांना अन्न धान्य किटचे वाटप करण्यात आले.
तृतीय पंथी लोकांची परिस्थिती पाहून कल्याण महापालिकेचे माजी वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय कुकडे यांनी खेद व्यक्त केला. इतर समाजाला कोणीतरी मदत करीत राहतात. पण या करोनाच्या महामारीत या समाजाकडे जर लक्ष दिले गेले नाही तर भयानक परिस्थिती या लोकांची होईल. आमच्यातले डॉक्टर सहकाऱ्यांनी या समाजातील वस्तीत यांची हेल्थ चेकअप कॅम्प ची व्यवस्था केली पाहिजे.
करोनाच्या महामारीतील मनुष्य समाजातील सर्वात शेवटचा वंचित घटक म्हणजे हिजडा. या दिवसात त्यांना भीक मिळणे कठीण, इतर कोणताही व्यवसाय नाही, नौकरी नाही, कोणी कामही देत नाही. भीक मागून जगणारा समाज.दुर्लक्षित घटक. वाटप करणारे येतात पण त्यांच्या पर्यंत कोणी पोहचत नाहीत. महापालिका आणि इतरांनी त्यांच्या कडे दुर्लक्ष केले. आताच काही दिवसा पूर्वी आम्ही कुष्टरोगी हनुमान नगर वसाहतीत अन्न धान्य वाटप केले तेव्हा काही तृतीय पंथी लोकांनी स्वतःची कैफियत आमच्या कडे मांडली होती.आम्ही पण माणसे आहोत आमच्या कडे पण लक्ष द्या. तेव्हाच आम्ही ठरवले होते पुढील वाटप हे फक्त तृतीय पंथी यांनाच करूया. आज आम्ही पूर्तता केली.
तृतीय पंथी लोकांची परिस्थिती पाहून कल्याण महापालिकेचे माजी वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय कुकडे यांनी खेद व्यक्त केला. इतर समाजाला कोणीतरी मदत करीत राहतात. पण या करोनाच्या महामारीत या समाजाकडे जर लक्ष दिले गेले नाही तर भयानक परिस्थिती या लोकांची होईल. आमच्यातले डॉक्टर सहकाऱ्यांनी या समाजातील वस्तीत यांची हेल्थ चेकअप कॅम्प ची व्यवस्था केली पाहिजे.
डॉ. संजय कुकडे यांच्या हस्ते तृतीय पंथी यांना
तांदूळ, गव्हाचे पीठ आणि गोडेतेल, साबण अन्नधान्य किट देऊन सुरवात करण्यात आली . महापालिकेच्या आयुक्त यांनी या वस्तीला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करण्याची विनंती करणार, तसेच कुष्ठरोगी आणि तृतीय पंथी यांच्या साठी वेगळे अन्नछत्र सुरु करण्याची मागणी करणार असल्याचे पत्रकार बाबा रामटेके
म्हणाले.
या अन्न धान्य वाटपाच्या प्रसंगी स्थानिक कार्यकर्ते सुरेश जाधव सलीम पटेल, रफिक शेख, यांनी उपस्थित राहून तृतीय पंथी यांना मदत केली.
No comments