Breaking News

*बुद्ध जयंती यंदा घरीच साजरी करा : केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले*

 *बुद्ध पौर्णिमेला शांततेचे दिवे लावा* 


कोरोना चा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने भारत सरकार ने लॉक डाऊन वाढविला आहे. कोरोना चा धोका टाळण्यासाठी  महाकारूणी तथागत भगवान गौतम बुद्धांची जयंती घरी च साजरी करावी. बुद्ध पौर्णिमेला आपल्या घरी संध्याकाळी शांततेचे दिवे लावावेत असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केले 
 मुंबई , : कोरोना चा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने भारत सरकार ने लॉक डाऊन वाढविला आहे. कोरोना चा धोका टाळण्यासाठी लॉक डाऊन चे नियम पाळले पाहिजेत. त्यामुळे यंदा  ७ मे रोजी येत असलेली महाकारूणी तथागत भगवान गौतम बुद्धांची जयंती घरी च साजरी करावी. बुद्ध पौर्णिमेला आपल्या घरी संध्याकाळी शांततेचे दिवे लावावेत असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केले आहे. 
 ७ मे रोजी तथागत भगवान बुद्धांची २५६४ वी जयंती संपूर्ण जगात साजरी होणार आहे. भगवान बुद्धांचा विचार हा माणसाला माणूस जोडणारा विचार आहे. प्रज्ञा शील करूणा अहिंसा समतेचा शांततेचा पुरस्कार करणारा बौद्ध धम्म आहे. आम्हाला अभिमान आहे की महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बौद्ध धम्माची दीक्षा दिली. बुद्ध जयंती सर्व जगात साजरी होते. दरवर्षी आंबेडकरी जनता बुद्ध जयंती मोठया प्रमाणात साजरी करते.
    मात्र या वर्षी कोरोना चा प्रदर्भाव वाढला असल्याने लॉकडाऊन चा नियम पळून जनतेने बुद्ध जयंती घरीच साजरी करावी. मी माझ्या घरीच बुद्ध जयंती साजरी करणार आहे. माझ्या घरी बुद्ध मूर्ती आहे. बुद्धमूर्तीला पुष्प अर्पण करून बुद्ध वंदना घेऊन बुद्ध जयंती घरी साजरी करणार आहे.
     बुद्धांनी शांततेचा संदेश दिला असून या बुद्ध जयंती ला शांततेच दिवा लावून घरा भोवती मेणबत्ती लावून बुद्ध जयंती साजरी करणार असल्याचे सांगत सर्वांनी बुद्ध जयंती घरीच साजरी करावी असे आवाहन ना रामदास आठवले यांनी केले आहे. 


             

No comments