Breaking News

महिला ही कोमल आहे कमजोर नाही : अमित शेंडे


नागपूर, ता. ९ : बेझनबाग दहा नंबर पूल  शाहिद स्मारक येथील उपसंपदा मानव विकास संस्था , स्मॅश कराटे क्लब , कराटे कोकोसाई इंडिपेंडेंट फेडरेशन इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिवस साजरा करण्यात आला.  


     कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सोशल वेल्फेरचे सुकेशनी टेलगोटे, नगरसेविका ममता सहारे, मुख्याध्यापिका बागडे, उच्च न्यायालयाचे वकिल प्रशांत साखरे, समाजसेवक दिनेश कोचे, कराटे कोकोसाईचे अध्यक्ष रविकांत मेश्राम, श्रीकांत मेश्राम, पावन येवले उपस्थित होते.

   महिला ही कोमल आहे कमजोर नाही ती सुद्धा  स्वता:चे  आत्मरक्षण करू शकते असे मत कराटे प्रशिक्षक अमित शेंडे यांनी व्यक्त केला. 
         कार्यक्रमाचे संचालन अक्षय चावरे  यांनी केले. 
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ब्रिजेश रामटेके, शिखा लाउतते, आकाश खोब्रागडे यांनी परिश्रम घेतले. 

1 comment:

  1. It's a true think Amit shende sir I like u r thought and u r all activities are good for women's

    ReplyDelete