सेंट रॉबेन पब्लिकमध्ये सावित्रीबाई फुले जयंती
नागपूर, ता. ५ : जरीपटका मिसळले आउट येथील सेंट रॉबेन पब्लिक अँड ज्युनिअर कॉलेज आणि न्यू चैतन्य स्कुल यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्सहात साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषा परिधान करून यांच्या जीवनावर कविता, भाषण, नाट्य सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापिका धनश्री बारसागडे, पर्यवेक्षिका आलिया अहमद , सारलेट फ्रान्सिस ,जयश्री पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन गौरव सहारे यांनी केले. आभार विजय मनवर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता रेखा रूईकर,वैशाली नवनागे, तेजस्वीनी कापसे ,रिया डोईफोडे,श्रेया ढोके,शुमेधा वारकर, बबिता फूले ,श्रेया मेश्राम,हर्षाली वानखेडे,जयश्री बुटे आदी शिक्षकवृंद व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
Good story
ReplyDelete