#अशोक चव्हाण यांची कॅबिनेट मंत्रीपदी निवड
![]() |
#अशोक चव्हाण यांची कॅबिनेट मंत्रीपदी सोमवारी शपथ घेताच भोकरमध्ये अतिषबाजी करून जल्लोष साजरा करतांना काँग्रेस कार्यकर्ते |
नागपूर, ता. ३१: #महाराष्ट्र राज्याचा मंत्रिमंडळ विस्तारात नांदेड चे लोकप्रिय नेते माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण यांची कॅबिनेट मंत्री पदी वर्णी लागून शपथविधी पार पडताच भोकर येथील काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अतिषबाजी करून जल्लोष केला.
विधानसभा निवडणुकीनंतर अशोक चव्हाण यांची सुरुवातीपासूनच महाविकास आघाडीत कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागेल अशी चर्चा होती अखेर आज या चर्चेला पूर्णविराम मिळत अशोक चव्हाण यांची कॅबिनेट मंत्रीपदी नियुक्ती होऊन शपथविधी पार पडताच भोकर शहरातील कार्यकर्त्यांनी एकच आनंदोत्सव साजरा केला.
No comments