नागपूर शहरात "बालकदिन"
पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती नागपूर शहरातील विविध शाळेत "बालकदिन" विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
नागपूर,ता : १५ स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान आणि आधुनिक भारताचे शिल्पकार पंडित जवाहरलाल नेहरू यांचा 14 नोव्हेबर हा जन्म दिन " बालक दिन " म्हणून देशभर साजरा केला जातो .नेहरू जींना लहान मूलं खूप आवडायची आणि मुलांना नेहरू जी पण खूप आवडायचे, साऱ्या देशातील मुले नेहरूजींना आवडीने" चाचा नेहरू"संबोधत असत. जरिपटका मिसाळ ले आऊट येथील सेंट रोबेन पब्लीक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज तसेच न्यु चैतन्य शाळा येथे बालक दिनानिमत्त मोबाइलचा वापर योग्य की अयोग्य या विषयावर वाद-विवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आला.
विषयाच्या बाजूने व विषयाच्या विरूद्ध विद्यार्थ्यांनी अभ्यासपुर्ण मते मांडली. यासह मुलांनी नेहरूजींच्या जिवनावर भाषनाच्या माध्यमातून प्रकाश टाकला शिवाय न्रूत्य,नाटिका सादर केल्या. कार्यक्रमाच्या शेवटी विविध कार्यक्रम सादर करणा-या विद्यार्थ्यांचा प्रमूख अतिथी मा.जोतिराव बारसागडे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन जयश्री पाटील यांनी केले. आभार आलिया अहमद यांनी मानले.
बालकदिनी बालपणाची आठवण : डॉ.अनिता भुते
नागपूर, ता : १५ पाचपावली येथील ब्लूस्टार कॉन्व्हेट येथे पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जयंतीनिमित्त " बालक दिन " साजरा करण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांनी बालक दिन व पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जीवनावर आधारित कविता सादर करीत सर्वांना बालदिनाची आठवण करून दिली.
विद्यार्थ्यांनी शिस्त व खोटे न बोलणे ह्या गोष्टीचा आपल्या जीवनात अवलंब केल्यास हेच बालक उद्याचे नेहरू होतील असे मुख्याध्यपिका डॉ. अनिता भुते यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन रसिका मस्नेवार यांनी केले. नेहा नारनवरे यांनी आभार मानले. शाळेतील शिक्षकवृंद व कर्मचारी उपस्थित होते.

भारतीय कृषी विद्यालयात बालकदिन साजरा
नागपूर, ता : १५ झिंगबाई टाकळी येथील भारतीय कृषी विद्यालय एन्ड ज्युनियर काॅलेजातील येथे पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात " बालक दिन " विद्यार्थी साजरा केला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब पन्नासे , सचिव राकेशभाऊ पन्नासे, प्राचार्य अर्चना पन्नासे , पर्यवेक्षिका दिपीका तुपकर , व्यवस्थापिका अनिता पवार , शाळेतील शिक्षकवृंद व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब पन्नासे , सचिव राकेशभाऊ पन्नासे, प्राचार्य अर्चना पन्नासे , पर्यवेक्षिका दिपीका तुपकर , व्यवस्थापिका अनिता पवार , शाळेतील शिक्षकवृंद व कर्मचारी उपस्थित होते.
सामाजिक संदेशातून बालकदिन
नागपूर, ता : १५ जयताळा येथील विद्यासाधना कॉन्व्हेट अँड हायस्कुलमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात " बालक दिन " साजरा केला
यावेळी नाटिकांमधून सामाजिक संदेशा सोबत शिक्षणाचे महत्व विषद करीत विद्यार्थ्यानी नृत्य सादर केला. यावेळी संस्थेचे सचिव संदीप सरटकर, मुख्याध्यपिका सरिता शेंडे, पर्यवेक्षक मंजिरी जोशी, मिनाक्षी मुल शाळेतील शिक्षकवृंद व कर्मचारी उपस्थित होते.

No comments