Breaking News

युथ फॉर रेव्होल्यूशनतर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवाद



नागपूर, ता. ११ गौतम बुद्ध, संत कबीर, महात्मा जोतिबा फुले यामहापुरुषांचा विचार पुस्तकात मायादित न राहता प्रत्येकाच्या  घराघरात पोहचावे या उद्देशाने  " एक उत्तर द्या आणि पुस्तक मिळावा " या उपक्रमातू एक आगळ्या वेगळया पद्धतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले, अशी माहिती पवन पाटील यांनी दिली.    
          ६३ व्या धम्मचक्र  प्रवर्तन दिनानिमित्त  युथ फॉर रेव्होल्यूशन तर्फे मागील 3 वर्षा पासून या उपक्रमात सहभागी असून यावर्षी "दीक्षा भूमी" येथे आठ हजार पुस्तकांचे  वाटप करण्यात आले.
          दीक्षाभूमी वर विद्यार्थ्यांना बाबासाहेब आंबेडकरांची  जन्म भूमी कुठली, महात्मा जोतिबा फुले कोण आहे?, संतकबीर, शिवाजी महाराज , छत्रपती शाहू महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अश्या थोर पुढ्याऱ्याच्या जीवनावर प्रश्न विचारण्यात आले. योग्य उत्तरं दिल्यास त्यांना समाजसुधारकांची पुस्तक देण्यात आली.
         यावेळी युथ फॉर रेव्होल्यूशनचे पवन पाटील, जितेंद्र गायकवाड, सागर बागडे , मछिंद्र गायकवाड,  दर्शना गायकवाड , सतीश मेश्राम , भूषण टेंभेकर, निकिता रामटेके , धम्मा मेश्राम आदी स्पर्धा परीक्षेची विद्यार्थी उपस्थिती होते.

No comments