पथनाट्यातुन फटाके मुक्त दिवाळीचा दिला संदेश : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलनचा उत्तर नागपुरातील दयानंद पार्क येथे जनजागृती उपक्रम
नागपूर, ता.४ भारतीय संस्कृतीत दिवाळी सण मोठया उत्साहात साजरा केल्या जाते. दरवर्षी ३०० पेक्षा जास्त लोक हे फटाक्या पासून होणारा ध्वनी आणि वायू प्रदूषणाच्या समस्येने ग्रासले जातात पर्यावरणाची हानी होते त्यामुळे फटाके व्यतिरिक्त पर्यावरपूरक "फटाके मुक्त दिवाळी साजरी करा" असा संदेश महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या उत्तर नागपूर शाखातर्फे जरीपटका येथील ना.सु.प्र दयानंद पार्क येथे पथनाट्यातुन सादर करण्यात आला.
पथनाट्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून संविधानावर पोवाडा, चळवळीचे गीते, आनंद(मामा)मेश्राम यांनी फटाके मुक्त दिवाळी वर कविता सादर करून नागरिकांचे लक्ष वेधले
पथनाट्याला रामभाऊ डोंगरे, शिवकुमार फुले, दीपक गजभिये, पुष्पा बोदाडे, जयश्री फोपरे, रवी सहारे, नरेश महाजन, अनिरुद्ध मेश्राम, सी बी चोरे, गिरीजा तांबे, नारायण भावे , रॉकी घृटके, गीतेश गजभिये , अविनाश डोंगरे, अक्षय थमके, चंद्रशेखर मेश्राम उपस्थित होते.
No comments