Breaking News

चक्कर मी टू मी टू के खुर्शी चली गई : युसूफ सागर



उत्तर नागपुरात पहिल्यांदा हास्य कवी सम्मेलन मध्ये नागरिकांशी संवाद करतांना  : आमदार डॉ. मिलिंद माने 

नागपूर .ता.४  दामन  बचा  के ले आ रहे थे... आते आते बुडापेमे  सियासत  चली गई .. हम  तो समज रहे कि आये थे  अच्छे  दिन... चक्कर मी टू  मी टू के खुर्शी चली  गई  असे हास्य कवी युसूफ सागर ने कविता सादर करुन रसिकांचे मन जिंकले. महर्षी वाल्मिकी प्रकटोत्सव  युवा समितीच्या वतीने महर्षी वाल्मिकी जयंती दिनानिमित्त उत्तर नागपुरात पहिल्यांदा हास्य कवी सम्मेलन रविवारी किदवाई पटांगणावर आयोजित करण्यात आला होता  . 
           यावेळी व्यासपीठावर आमदार डॉ.मिलिंद माने , स्थायी समिती अध्यक्ष म.न.पा वीरेंद्र  कुकरेजा , नगरसेवक  विजय चुटेले , अजय हाथीबेड  माजी महापौर  राजेश तांबे , दिलीप गौर ,  हास्य कवी  दिनेश  देहाती , अंतुजि झकास , निशा तिवारी  उपस्थिती होते. वाल्मिकी समाज एकत्र  येऊन युवा शक्ती बनणे गरचे आहे असे मिलिंद माने म्हणाले. 
संचालन मनीष वाजपेयी यांनी केले.  यावेळी कार्यक्रमाला विशेष सहकार्य  विजय तांबे , सतीश कागदे , लक्की समुद्रे , युवा शक्तीचे  विक्की सारवान , उज्वल गाडोती यांनी केले व वाल्मीकि समाजाचे  नागरिक  उपस्थित होते.

No comments