Breaking News

लायन्स क्लब ऑफ नागपूर ग्रीन सिट डिस्ट्रीकचा पदग्रहण




नागपूर, ता. २७ नागपूर येथील लायन्स क्लब ऑफ नागपूर ग्रीन सिट डिस्ट्रीक ३२३४ एच १ शाखेचा २४ वा पदग्रहण समारोह नुकताच मोठया उत्साहात पार पडला.
         या पदग्रहण समारोह कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून राजे मुधोजी भोसले, विनोद वर्मा, अॅड. संदिप खंडेलवाल, लक्ष्मीकांत देशपांडे, अन्विकांत वर्मा आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी नवनियुक्त अध्यक्षा नमीता राय यांनी पूर्व अध्यक्षा डाॅ. माया गायकवाड यांच्या कडून पदभार स्विकारला.  
          यावेळी लायन्स क्लब ऑफ नागपूर महाल डिस्ट्रीक एच १ या शाखेची प्रथम कार्यकारणी जाहिर करण्यात आली. यात अध्यक्ष म्हणून अजय हटवार, सचिव राजेश सूर्वे, कोषाध्यक्ष देवेंद्र गुज्जर, यांचा समावेश आहे. कार्यक्रमाचे पास्ताविक डाँ. माया गायकवाड यांनी केले. तर बी. सी. पाल यांनी सन २०१७ -१८ या वर्षाचा लेखाजोखा सादर केला. यावेळी राजे मुधोजी भोसले, विनोद वर्मा यांनी नवनियुक्त अध्यक्षा नमीता राय, सचिव गोपाल देवतारे, कोषाध्यक्ष अजय सिंह, अरुण घोडसे, अॅड. बी. सी. पाल, शाम पाठक, प्रशिध्दी प्रमुख आतिश तामगाडगे, सहसचिव मुनालीनी राजे भोसले, सहकोषाध्यक्ष प्रभाकर धोटे, सद्स्य राकेश जैस्वाल, यांना शपथ दिली. याप्रसंगी अध्यक्षा नमीता राय यांनी महिला गृहउद्योग संस्थेला उद्योग सुरु करण्याकरीता ५००० रुपयांची देणगी दिली. तर सचिव गोपाल देवतारे यांनी गरीब मुलांना सायकल भेट दिल्या.  कार्यक्रमाचे संचालन रानी मुनालीनी राजे भोसले व आभार गोपाल देवतारे यांनी मानले.   कार्यक्रमाला यशस्वी करण्यास्तव क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.
_____________________________________________

आता मिळवा फ्री जॉब्स अलर्ट / रिजल्ट अलर्ट आणि बरंच काही तुमच्या मोबाईल मध्ये FastAds app सोबत अगदी मोफत.
क्लिक  करा http://fastads.in/  (Activation साठी Share करा हि लिंक)

No comments