Breaking News

भारतीय कृषी विद्यालयाच्या विद्यार्थ्याचे यश; साई ढबालेने ६० मीटर धावण्यात जिंकले सुवर्णपदक


साई ढबालेने ६० मीटर धावण्यात जिंकले सुवर्णपदक

नागपूर :  जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर नागपूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. झिंगाबाई टाकळी परिसरातील गीता नगर येथील भारतीय कृषी विद्यालयाचा विद्यार्थी साई अमोल ढबाले याने जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकून नेत्रदीपक यश संपादन केले आहे.नागपूर युनिव्हर्सिटीच्या मैदानावर नुकत्याच पार पडलेल्या १२ वर्षांखालील वयोगटाच्या स्पर्धांमध्ये साईने आपल्या कौशल्याचे दर्शन घडवले. ६० मीटर धावण्याच्या स्पर्धेत त्याने प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णपदक (Gold Medal) आपल्या नावावर केले. तसेच, लांब उडी (Long Jump) प्रकारात त्याने द्वितीय क्रमांक मिळवत रौप्यपदक (Silver Medal) जिंकले.अवघ्या ५ वीत शिकणाऱ्या साईने आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, क्रीडा शिक्षक आणि शाळेतील शिक्षकांना दिले आहे. त्याच्या या घवघवीत यशाबद्दल भारतीय कृषी विद्यालयाच्या परिसरात आनंदाचे वातावरण आहे.विद्यार्थ्याच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब पन्नासे, सचिव राकेशभाऊ पन्नासे, मुख्याध्यापिका अर्चना पन्नासे, पर्यवेक्षिका दीपिका तुपकर यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी साईचे मनापासून अभिनंदन केले असून त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


Sai Dhabale of Bharatiya Krishi Vidyalaya soars to victory with a gold medal at the district-level athletics competition!

Nagpur :  With determination and perseverance, another feather has been added to Nagpur's cap. Sai Amol Dhabale, a student of Bharatiya Krishi Vidyalaya in Geeta Nagar, Zingabai Takli area, has achieved spectacular success by winning gold and silver medals in the district-level athletics competition. Sai showcased his skills in the recently concluded competitions for the under-12 age group at the Nagpur University grounds. He secured first place in the 60-meter race, winning a gold medal. He also won a silver medal by securing second place in the long jump event. Sai, who is only in the 5th grade, has attributed his success to his parents, sports teacher, and school teachers. There is an atmosphere of joy at Bharatiya Krishi Vidyalaya following his remarkable achievement. The institution's president Balasaheb Pannase, secretary Rakeshbhai Pannase, headmistress Archana Pannase, supervisor Deepika Tupkar, along with all the teachers and non-teaching staff, have heartily congratulated Sai on his success and wished him well for his future endeavors.

No comments