Breaking News

रासेयो शिबिरातून वाहनचालकांसाठी जनजागृती


नागपूर, ता. २७ : प्रियदर्शनी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग नागपूर येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांतर्फे संविधान चौक येथे वाहनचालकांसाठी एक दिवसीय जनजागृती शिबिर नुकतेच आयोजित करण्यात आले.

          रस्ते अपघातात दरवर्षी लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागतो, तर अनेक जन गंभीर जखमी होतात. त्यामुळे अपघातग्रस्त कुटुंबीयांना जीवनभर आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. म्हणूनच रस्त्यांची सुरक्षितता निर्माण करणे अत्यावश्यक व काळाची गरज आहे. त्या अनुषंगानेच वाहनचालकांत जनजागृती निर्माण करण्याच्या दृष्टीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

          सदर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. ए. ढाले, उपप्राचार्य जी. एम. आसुटकर, छात्र कल्याण डीन डॉ. व्ही. के. ताकसांडे, कार्यक्रम अधिकारी डॉ. एन. एस. अंबटकर तसेच राष्ट्रीय सेवा योजना अध्यक्ष जतिन बिसेन, राष्ट्रीय सेवा योजना अध्यक्षा श्र्लेशा गजभिये यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात महाविद्यालयाच्या 30 विद्यार्थी, विद्यार्थिनींनी सक्रिय सहभाग घेतला.

Public awareness for motorists through Raseyo camp


Nagpur, 27 : A one day awareness camp for motorists was recently organized at Constitution Chowk by students of National Service Scheme of Priyadarshini College of Engineering, Nagpur.

           Millions of people lose their lives every year in road accidents, while many people are seriously injured. Due to this, the families of the accident victims have to face financial and mental hardship throughout their life. Therefore, creating road safety is essential and the need of the hour. Accordingly, this camp was organized to create public awareness among the drivers.

           Principal of said college Dr. S. A. Dhale, Vice Principal G. M. Asutkar, Student Welfare Dean Dr. V. K. Taksande, Program Officer Dr. N. S. Ambatkar along with National Service Scheme President Jatin Bisen, National Service Scheme President Shresha Gajbhiye guided the camp. 30 male and female students of the college actively participated in this camp.

No comments