Breaking News

अंजुमन हायस्कूलमध्ये चिंतन दिवस साजरा

 

नागपूर : सदर  अंजुमन हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज  येथे 22 फेब्रुवारी 2023 रोजी  स्काऊट गाईडचे जनक लॉर्ड बेडन पॉवेल व लेडी बेडन पॉवेल जयंती निमित्त चिंतन दिवस व जागतिक स्काऊट दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष  जावेद राणा  ( मुख्याध्यापक) होते. व प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे उपमुख्याध्यापक  जावेद शेख, प्राध्यापक  शारिक सिद्दिकी, सफिया बेगम  (पर्यवेक्षक ) तसेच स्काऊट मास्टर फिरोज एस. खान व गाईड कॅप्टन आलिया  , कौसर मॅडम उपस्थित होते.  फिरोज एस. खान  लॉर्ड बेडन पॉवेल व लेडी बेडन पॉवेल यांच्या जीवनावर प्रकाश टाकला तर श्री. जावेद सर यांनी शिस्तीचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. तसेच विविध स्पर्धा घेण्यात आल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व विविध पुरस्कार देण्यात आले. या कार्यक्रमाचे संचालन आलिया मॅडम यांनी केले.

Chintan Day celebrated in Anjuman High School

 Nagpur: On February 22, 2023, Chintan Day and World Scout Day were celebrated at Sadar Anjuman High School and Junior College on the birth anniversary of Lord Bedon Powell and Lady Bedon Powell, fathers of scout guides. The program was chaired by Javed Rana (Principal). And Vice Principal of the school Javed Shaikh, Professor Sharik Siddiqui, Safia Begum (Supervisor) and Scout Master Feroze S. were the chief guests. Khan and guide Captain Alia, Kausar Madam were present. Feroze S. Khan throws light on the life of Lord Bedon Powell and Lady Bedon Powell while Mr. Javed Sir convinced the students about the importance of discipline. Also, various competitions were held and students were given certificates and various awards. The program was moderated by Alia Madam.

No comments