Breaking News

संविधान नसता, तू साहेब नसता : प्रबोधनकार प्रा. प्रशांत नारनवरे

 

लिटील गायिका स्पृहा भीम बुद्ध गीतातून प्रबोधन करतांना

नागपूर,  :  डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा वारसा एका पिढीतून दुसऱ्या पिढीपर्यंत पोहचविण्याचे काम भारतातील प्रत्येक नागरिकांना करायला पाहिजे. ' संविधान नसता, तू साहेब नसता 'असे राष्ट्रीय प्रबोधनकार  प्रा. प्रशांत नारनवरे यांनी  भीम गीतातून उपासक-उपसिकांना प्रबोधन  केले.  नारी रोड सम्यक बुद्ध विहाराच्या प्रांगणात युवा प्रबोधनकार अजयकुमार फाऊंडेशनतर्फे  काळाराम मंदीर सत्याग्रह, महाडचा सत्याग्रह आणि जागतिक महिला दिनानिमीत्त  यांच्या संयुक्त विद्यमाने प्रबोधनात्मक गीतांचा बहरदार कार्यक्रमाचे  आयोजन करण्यात  आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सेंट रॉबेन पब्लिक स्कुलचे संचालक ज्योतीराव बारसागडे, माजी जिल्हा सरकारी वकील विलास राऊत, डॉ.दीपक रामटेके, नागप्रकाश भन्ते उपस्थित होते. 
कार्यक्रमला उपस्थित उपासक -उपासिका
यावेळी  गायक प्रबोधनकार अनिरूद्ध शेवाळे,  विकास राजा,   प्रा. प्रशांत नारनवरे , मनोज राजा गोसावी, लिटील मास्टर आर्या, लिटील गायिका स्पृहायांनी आपल्या भीम गीतातून उपासक-उपासिका यांना प्रबोधन केले. 
कार्य क्रमाचे आयोजन युवा प्रबोधनकार तथा समाज सेवक  सन्मानित अजयकुमार यांनी केले.
     यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता डॉ. दक्षु रामटेके , राजकुमार टेंभुर्णीकर,प्रकाश बडोले, रमेश भिमटे, हेमचंद्र वैद्य , सतीश मेश्राम पायल भिमटे, रोहन शेंडे ,  यांनी परिश्रम घेतले.


आज कामठी रोड पिवळी नदी विश्वदीप बुद्ध विहारात भीम बुद्ध गीतांचा 
बहरदार कार्यक्रमाचे  सायंकाळी ५ वाजता आयोजन करण्यात  आले.

If there was no constitution, you would not be the master: Prabodhankar  Prashant Naranware

Nagpur: The work of passing on the legacy of Dr. Babasaheb Ambedkar's thought from one generation to another should be done by every citizen of India. Prashant Naranware enlightened the devotees through Bhim Gita. In the premises of Nari Road Samyak Buddha Vihara, the young Prabodhankar Ajay Kumar Foundation jointly organized a program of enlightening songs in association with Kalaram Mandir Satyagraha, Mahadcha Satyagraha and World Women's Day.

No comments