Breaking News

शिक्षक आमदाराच्या दारी, शिक्षकांचे ठिय्या आंदोलन

प्रदीप जांगळे

नागपूर,ता. १३ महाराष्ट्र   राज्य  विना अनुदानित  शाळा कृती  समिती नागपूर  विभागातर्फे १५ आगस्ट स्वतंत्रदिनानिमित्त शिक्षक आमदाराच्या दारी शिक्षकांचे ठिय्या आंदोलन करणार असल्याची माहिती  महाराष्ट्र राज्य विना अनुदानित शाळा  कृतीचे जिल्हा सचिव प्रदीप जांगळे यांनी दिली.   

महाराष्ट्रातील  अशंत अनुदानित (20 टक्के व 40 टक्के) अघोषित  अपात्र, असणाऱ्या  सर्व शाळांना मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये सरसकट हा शब्द काढून पूर्वीच्या प्रचलित नियमानुसार 100टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेण्याकरीता 15 आगस्ट  2021 पासून राज्यातील सर्व शिक्षक व पदवीधर आमदार यांच्या दालनात ठिय्या आंदोलन.  
 महाराष्ट्र शासनाने  शिक्षकांचे   व कर्मचारी यांचे अनेक प्रश्न  विनाकरण प्रलंबित ठेवले आहेत. गेल्या 20 वर्शापासून विनामोबदला काम करीत असूनही शासनाच्या पूर्वीच्या प्रचलित नियमानुसार 100 टक्के वेतन अनुदान मिळणे आवश्यक  असतांना पुढील प्रचलित नियमाप्रमाणे कोणताही टप्पा वाढ दिलेला नाही. त्यामुळे 100 टक्केच्या हक्कदार असतांना केवळ 20 व 40 टक्के अनुदान देवून शिक्षकांची शासनाने थट्टा केलेली आहे. अनुदान पात्र  असणाऱ्या शाळा  त्रृटीपूर्तता करून देखील घोषित  होण्यापासून प्रलंबित ठेवले आहे. व त्यामुळे नको असलेले नियम  लावून  शाळा अपात्र करीत आहेत.
निवडणुकीपूर्वी आपल्या मंत्रीमंडळातील सर्व मंत्री व सर्व आमदार यांनी आमचे सरकार आल्यानंतर प्रचलित नियमानुसार 100 टक्के अनुदान दिल्या जाईल असे जाहीर व्यक्तव्य केलेले आहेत. त्या प्रमाणे शब्द पाडणे शासनाची जबाबदारी आहे. याकरीता 26 जुलै 2021 रोजी शिक्षण आयुक्त यांच्या दालनात आंदोलन करण्यात आले. व त्यानंतर 9 आॅगस्ट 2021 रोजी शिक्षणाधिकारी व शिक्षण उपसंचालक यांच्या कार्यालयासमोर ढोल बजाओ/घंटा नाद आंदोलन करण्यात आले. तरी देखील शासनाने दखल घेतली नाही. ही बाब शैक्षणिक क्षेत्राला काळीमा फासणारी आहे.  ही सर्व जबाबदार राज्यातील सर्व शिक्षक व पदवीधर आमदार यांची आहे.
करीता सर्व महाराष्ट्रातील शिक्षक  व पदवीधर आमदार मिळून आमचा प्रश्न त्वरीत मार्गी लावावा. अन्यथा 15 आॅगस्ट 2021 पासून राज्यातील सर्व षिक्षक/ पदवीधर आमदार यांच्या दालनात ठिय्या आंदोलन सुरू करण्यात येत आहे. जर मागण्या मान्य केल्या नाही तर 16 आॅगस्ट पासून उग्र आंदोलन करण्यात येईल. असे  आवाहन  आर. झेड. बावीसकर, सुरेष कामनापूर, अजय भोर, विजय पिसे, प्रदिप जांगळे, वाय सी बोरकर, केवल मेश्राम, माला गोडघाटे, संदीप सरटकर, विजय आत्राम , धर्मषिल वाघमारे, मनिशा गोरले, राजेष मासुरकर, ढोरे मॅडम यांनी केले. 

No comments