जागतिक पर्यावरणदिनी "एकवृक्ष" लावावे ; नागरिकांना आवाहन : बसपचे पक्षनेते जितेंद्र घोडेस्वार
नागपूर, ता. २ : कोरोनाच्या काळात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे बरेच नागरिकांना मरतांना बघितले, त्यामुळे येणाऱ्या भविष्यात नागपूरकरांवर अशी वेळ येऊ नये त्यासाठी नागपूर सिटीतील दहन घाटापासून ते गेलोगल्लीत नागरिकांनी बोधिवृक्ष, अशोकाचेवृक्ष, कडुनिबांचेवृक्ष, तुळशीचा रोपट लावल्यास पर्यावरणाचा समतोल राखून ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास मदत होईल, त्यासाठी माझी जबाबादारी म्हणून प्रत्येक नागरिकांनी येत्या जागतिक पर्यावरणदिनी "एक वृक्ष " लावावे असे आवाहन नवनियुक्त बसपचे पक्षनेते जितेंद्र घोडेस्वार यांनी केले. घोडेस्वार यांचे पक्षनेते पदग्रहण समारोह बसपचे पक्ष पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित नागपूर महानगर पालिकेच्या कक्षात पार पडले.
यावेळी बहुजन समाज पार्टीचे पदाधिकारी यांनी
पुष्पगुच्छ देऊन जितेंद्र घोडेस्वार यांचे स्वागत केले.
निवडणुकीच्या वर्षभराआधी पुन्हा पक्षनेता बदललेला आहे. यापूर्वी अडीच वर्षे मोहम्मद जमाल तर, दीड वर्षे वैशाली नारनवरे यांच्याकडे पक्षनेते पदाची जबाबदारी होती. पक्षाने आता जितेंद्र घोडेस्वार यांच्याकडे पक्षनेतेपदाची जबाबदारी सोपविली आहे. घोडेस्वार हे प्रभाग क्र. ६ चे मनपात बसपातर्फे प्रतिनिधित्व करतात. बसपाने पक्षातील नगरसेवकांना वेगवेगळ्या संधी दिली. घोडेस्वार हे वर्षभरासाठी पक्षातर्फे पक्षनेते असतील घोडेस्वार यांनी बसपाच्या जिल्हाध्यक्ष, जिल्हाप्रभारी , प्रदेश महासचिव पदाची जबाबदारी सांभाळली.
"One Tree" should be planted on World Environment Day; appeal to citizens: BSP group leader Jitendra Ghodeswar
Nagpur, 2: During the Corona period, many people died due to lack of oxygen. Newly appointed BSP group leader Jitendra Ghodeswar appealed to the people to plant "one tree" on the upcoming World Environment Day. The inauguration ceremony of Ghodeswar's group leader was held in the presence of BSP office bearers in the room of Nagpur Municipal Corporation. On this occasion, the office bearers of Bahujan Samaj Party welcomed the group leader Jitendra Ghodeswar with a bouquet of flowers.
The group leader has changed again before the election year. Earlier, Mohammad Jamal was the group leader for two and a half years, while Vaishali Naranware was the group leader for one and a half years. The party has now handed over the responsibility of group leadership to Jitendra Ghodeswar. Horseman Ward no. 6 are represented by Manpat. The BSP gave different opportunities to the party corporators. Ghodeswar will be the party's group leader for the rest of the year.
No comments