आंबेडकरी चळवळील प्रज्ञावंत कार्यकर्ता डाॅ. कृष्णा कांबळे यांचे निधन
![]() |
डाॅ. कृष्णा कांबळे |
नागपूर, : डाॅ. कृष्णा कांबळे यांचे निधन ही अत्यंत दुःखद व धक्कादायक घटना. डाॅ.कांबळे हे कॅन्सर तज्ञ होते परंतु त्यांनी स्वतः चे हाॅसपिटल उभे न करता गरिब रूग्णांची सेवा करण्यासाठी शासकीय मेडीकल काॅलेज मध्ये सेवानिवृत्ती नंतर ही अनेक वर्षे रूग्णसेवा प्रदान करुन हजारो कॅन्सर रुग्णांना रोगमुक्त करून मानवतेची सेवा केली.वैद्धकिय सेवेशिवाय त्यांनी आंबेडकरी चळवळीसाठी मोठे योगदान दिले. नागपुर विद्यापीठाद्वारे प्रकाशित "Dr Ambedkar: Architect of Modern India" ह्या गौरव ग्रंथाच्या प्रकाशनात त्यांचे महत्त्वाचे योगदान होते.नागपुर विद्यापीठाच्या बौद्ध अध्ययन केंद्रात त्यानी अंशदानात्मक शिक्षक म्हणून अनेक विद्यार्थ्यांना घडवीले. विद्यापीठाने त्यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन त्यांचा समाजनिष्ठ सेवेचा गौरव केला होता. २६ नोव्हेंबर २०१९ रोजी दिक्षाभुमीवर त्यांच्या ७१ व्या जन्म दिनानिमित्त त्याचा नागरि सत्कार करून त्यांच्या कार्याबद्दल समाजाद्वारे कृतज्ञता व्यक्त करण्यात आली होती. महाराष्ट शासनाने नुकताच त्यांची डाॅ. बाबासाहेब आबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीच्या सदस्य सचिव पदी नियुक्ती करुन त्यांचा गौरव केला होते. डाॅ कांबळे यांच्या निधनाने एक मानवतावादी डॉक्टर,प्रज्ञावंत कार्यकर्ता हरविला आहे त्याच्या स्मृतीला विनम्र अभिवादन
The wise activist of the Ambedkar movement, Dr. Krishna Kamble passes away
Nagpur,: The demise of Dr.Krishna Kamble is a very sad and shocking event. Dr.Kamble was a cancer specialist but he served humanity for many years after his retirement from the Government Medical College to serve poor patients without setting up his own hospital. He also served humanity by curing thousands of cancer patients. He was instrumental in the publication of the glorious book "Dr Ambedkar: Architect of Modern India" published by the University of Nagpur. The university honored him with the Lifetime Achievement Award for his social service. He was felicitated on the occasion of his 71st birth anniversary on 26th November 2019 at Diksha Bhoomi and the society expressed its gratitude for his work. The Government of Maharashtra recently appointed Dr.Krishna Kamble He was honored by being appointed as the Member Secretary of Babasaheb Abedkar Charitra Sadhane Prakashan Samiti. A humane doctor, a wise activist has been lost in the demise of Dr. Kamble.
No comments