कायदा हा सर्व महिलांसाठी समान आहे : अर्चना गजभिये
![]() |
वकील महिलांचा सत्कार करतांना डी.बी.एचे अॅड. विलास राऊत |
नागपूर : कायदा हा सर्व महिलांसाठी समान असून कुठल्याही क्षेत्रात मागे पडू नये सावित्रीबाई फुले यांचे विचार पुस्तकापुरते मर्यादित न ठेवता आचरणात आणावे असे डी.बी.ए माजी सदस्य अॅड. अर्चना गजभिये जिल्हा सत्र न्यायालय वकील संघटनेच्या आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
सिविल लाईन आकाशवाणी चौक येथील जिल्हा सत्र न्यायालय वकील संघटनेतर्फे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमीत्त कार्यक्रमाचे रूम १ बी येथे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जिल्हा सत्र न्यायालय वकील संघटेनचे अध्यक्ष अॅड. कमल सतुजा, माजी अध्यक्ष
अॅड.प्रकाश जयस्वाल, सचिव अॅड. नितीन देशमुख, माजी अति. जिल्हा सरकारी वकील अॅड. विलास राऊत, अॅड. उषा गुजर, रॉयल किड्स इंग्लिश स्कुलची संचालिका व माजी डी.बी.ए सदस्य अॅड. अर्चना गजभिये, अॅड. छायादेवी यादव, एन७ न्यूज व्हॉइसचे सहसंपादक कोमल राऊत उपस्थित होते.
प्रत्येक महिलांनी एक पुरुष मंडळीला शिक्षित केले तर समाजात मोठे परिवर्तन होईल असे मत अॅड.उषा गुजर माणिकपुरे यांनी व्यक्त केले. यावेळी सामाजिक क्षेत्रात अटल सन्मान-२०२० पुरस्कार मिळाल्याबद्दल अॅड. विलास राऊत यांचे डी.बी.एचे अध्यक्ष अॅड. कमल सतुजा यांच्याहस्ते यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाला अॅड.सूर्यकांत जैस्वाल, अॅड. राजरत्न टेंभूर्णे , अॅड. प्रितम ठवरे, अॅड. राजेश नायक, अॅड. गुणवंत रामटेके, अॅड. सविता कांबळे, अॅड. अर्चना मेश्राम, अॅड. पल्लवी गवई, अॅड. ममता रामटेके, अॅड. लिहीपांडे ,अॅड. गजभिये, अॅड. बॅनर्जी , अॅड. युवराज्ञी रामटेके अॅड. पराग उके, अॅड. भूपेश चव्हाण कर्मचारी रामप्रसाद शाहु, किरण पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन
अॅड.विलास राऊत यांनी केले.
अॅड
शबाना खान यांनी आभार मानले.
Great
ReplyDelete