Breaking News

जाईबाई चौधरी ज्ञानपीठच्या संजना टेंभुर्णेची  केंद्र सरकारकडून डॉ.आंबेडकर नॅशनल मेरीट अवार्डसाठी निवड 

शिक्षणात जिद्द आणि चिकाटीच्या असली तर गरिबी तुमच्या कितीही पाठीशी असली तरी यशाचे  शिखर गाठण्यास  कोणीही वंचित करू शकत नाही....  असे नागपुरातील जरीपटका परिसरातील  मेकोसबाग   लिम्बुनी नगर   येथील झोपडपट्टीत राहणाऱ्या पेंटरच्या मुलीची  डॉ.आंबेडकर नॅशनल मेरीट अवार्डसाठी केंद्र सरकारकडून निवड  झाल्याबद्दल  सर्वत्र कौतुक होत आहे.


सुरेश सुखदेवे : न७ न्यूज वॉईस 
नागपुर: जाईबाई चौधरी जूनियर कॉलेजमध्ये गरीब सामान्य कुटुंबातून येऊनही यश संपादन करणाऱ्या  विद्यार्थिंनींच्या यादीमधील आणखी एक नाव म्हणजे  संजना विनोद टेंभुर्णे. संजनाने २०१८ वर्षी बारावी कॉमर्समध्ये ९४. २० टक्के  गुण प्राप्त करून सर्वांनाच चकित केले. जरीपटका मेकोसबाग  लिम्बुनीनगर  झोपडपट्टीत  येथे राहणाऱ्या  संजनाचे वडील पेंटर असून तिचे मामा  मुकेश कडबे तिच्या शिक्षणात मदत करतात. डॉ. आंबेडकर प्रतिष्ठान, सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय, भारत सरकारच्या ५० हजार  मेरीट अवार्डसाठी संजनाची निवड झाल्याबद्दल  सर्वत्र कौतुक होत आहे. ' डॉ.आंबेडकर नॅशनल मेरीट अवार्ड ' या योजने अंतर्गत संजनाला ५० हजार रोख प्राप्त होणार असून जाईबाई चौधरी जूनियर कॉलेज मधील हा अवार्ड प्राप्त करणारी संजना ही पाचवी विद्यार्थिनी आहे यापूर्वी . प्रेरणा बाराहाते ६० हजार , संस्कृती घरडे ४० हजार , शुभांगी खंडारे आणि निकिता गोंडाने हिलासुद्धा २० हजार चे रोख बक्षीस केंद्र सरकारकडून प्राप्त झालेले आहे. 
संजनाने आपले मत व्यक्त करताना म्हंटले की, गरीब आणि सामान्य कुटुंबातील मुलींना गुणवत्तेचा मार्ग दाखविणार्याा मंगळवारी बाजार, सदर येथील जाईबाई चौधरी जूनियर कॉलेज मध्ये शिकणार्याा माझ्या सारख्या अनेक मुलींचे भविष्य येथे साकारले जाते. दहावीत कमी गुण मिळाले असले तरी बारावीत ८० टक्के ते ९५ टक्के घेऊन पास होणार्याक मुलींची संख्या येथे भरपूर आहे. दहावीत ४२ टक्के  घेणारी कु.प्राची बहेलिया बारावी बोर्ड परीक्षेत ७७ टक्के , दहावीत ४८ टक्के  घेणारी .अश्विनी पांचाले बारावीत ८० टक्के , दहावीत ५७  टक्के मिळालेल्या  वंशिका टेंभुर्णे आणि प्रज्ञा ठेपाले या विद्यार्थिनीनी बारावीत ८३ टक्के  प्राप्त करणार्या पाच या मुलींचे स्वप्न जाईबाई चौधरी ज्ञानपीठाणे पूर्ण केले. आपल्या यशात आपले कुटुंब व कॉलेजमधील सर्व शिक्षकांचे तिने आभार मानले. जाईबाई चौधरी ज्ञानपीठात नियमित वर्ग, ध्यानाचे प्रशिक्षण, मोटिवेशन आणि सांस्कृतिक कार्यक्रमातून मिळणारे ज्ञान व उत्साहाने आपल्यामध्ये फार बदल घडल्याचे मत संजनाने व्यक्त केले.
जाईबाई चौधरी संस्थेचे सचिव आचार्य सुधाकर चौधरी, संचालिका प्रभा चौधरी, डायरेक्टर डॉ. शिल्पा पाझारे, प्राचार्य राजेश अंबुलकर तसेच ज्येष्ठ शिक्षक प्रा.बंडू काटपेलवार, प्रा.सुदत्त मेश्राम, प्रा.सुरेश सुखदेवे, प्रा.रूपा कोकाटे, प्रा.अर्शिया पठान, प्रा.अनीता रोडगे यांनी संजनाचे कौतुक करून भावी यशासाठी व सुवर्ण भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या व अभिनंदन केले.

संपादन 
कोमल राऊत
सहसंपादक  न७ न्यूज वॉईस नागपुर  

Sanjana Tembhurne of Jaibai Chaudhary Jnanpith selected by Dr. Govt. For Dr. Ambedkar National Merit Award

If you are persistent in education and perseverance, no one can deprive you of the pinnacle of success no matter how much poverty is behind you ....

Suresh Sukhdeve: N7 News Voice 
Nagpur: Another name in the list of students who have achieved success in Jaibai Chaudhary Junior College despite coming from a poor ordinary family is Ku. Sanjana Vinod Tembhurne. Sanjana has done 94 in 12th Commerce in 2018. Surprised everyone by getting 20% ​​marks. Sanjana's father is a painter living in Jaripatka Mekosbagh Limbuninagar slum and her uncle Shri. Mukesh Kadbe helps in her education. Dr. Sanjana's selection for the Ambedkar Pratishthan, Ministry of Social Justice and Empowerment, Government of India's 50,000 Merit Award is being lauded everywhere. Sanjana will receive Rs 50,000 under the 'Dr. Ambedkar National Merit Award' scheme. Sanjana is the fifth student from Jaibai Chaudhary Junior College to receive this award. Prerna Barahate 60,000, Sanskriti Gharde 40,000, Shubhangi Khandare and Nikita Gondane have also received cash prizes of Rs 20,000 from the Central Government.

Expressing her views, Sanjana said that the future of many girls like me, who are studying at Jaibai Chaudhary Junior College in Mangalwari Bazar, Sadar, which shows the way of quality to girls from poor and ordinary families, is being realized here. Even though they got less marks in 10th standard, there are a lot of girls who pass with 80% to 95% marks in 12th standard. Prachi Bahelia, who got 42% in 10th, got 77% in 12th board exam, Ashwini Panchale got 80% in 12th, Vanshika Tembhurne got 57% in 10th and Pragya Thepale got 83% in 12th. . She thanked her family and all the teachers in the college for her success. Sanjana expressed the view that the knowledge and enthusiasm gained from regular classes, meditation training, motivation and cultural programs at Jaibai Chaudhary Dnyanpeeth has changed us a lot.

Secretary of Jaibai Chowdhury Society Acharya Sudhakar Chowdhury, Director Prabha Chowdhury, Director Dr. Shilpa Pajare, Principal Rajesh Ambulkar as well as Senior Teachers Prof. Bandu Katpelwar, Prof. Sudatta Meshram, Prof. Suresh Sukhdeve, Prof. Rupa Kokate, Prof. Arshia Pathan, Prof. Anita Rodge appreciated Sanjana and wished her for future success and golden future. Congratulations.

Edited by Komal Raut with Editor N7 News Voice Nagpur

No comments